Air-Pollution
Air-Pollution 
पुणे

सहा महिने प्रदूषित हवेत जगत आहेत पिंपरी- चिंचवडमधील नागरिक

सुधीर साबळे

पिंपरी - निरनिराळ्या कारणांमुळे राजधानी दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वत्र चर्चा सुरू असताना, आता देशातील मोठी शहरेही त्याला अपवाद राहिलेली नाहीत. राज्यातील उद्योगनगरी म्हणून लौकिक असलेल्या पिंपरी- चिंचवडमधील नागरिकही वर्षातील तब्बल सहा महिने प्रदूषित हवेत जगत असल्याचे वास्तव पुढे आले आहे. त्याला कारणे अनेक असली तरी, वाहनांची वाढती संख्या, मेट्रोचे सुरू असलेले काम आणि शहरात होत असलेली बांधकामे ही प्रदूषणाची प्रमुख कारणे मानली जात आहेत.

निरोगी जीवन जगण्यासाठी हवेतील धूलिकणांचे दर महिन्याचे प्रमाण हे शंभर मायक्रोग्रॅम प्रतिमीटर क्‍यूब तर नायट्रोजन डायऑक्‍साईडचे प्रमाण हे ८० मायक्रोग्रॅम प्रतिमीटर क्‍यूब असणे आवश्‍यक असते. मात्र, गेल्या वर्षी जानेवारी ते मार्च आणि ऑक्‍टोबर ते डिसेंबर या कालावधीत पिंपरी-चिंचवड शहरात हवेतील धूलिकणांचे प्रमाण १३० मायक्रोग्रॅम प्रतिमीटर क्‍यूबपर्यंत पोचले होते. भोसरीत तर धूलिकणांचे प्रमाण १८० मायक्रोग्रॅम प्रतिमीटर क्‍यूबपर्यंत पोचले आहे. पिंपरी-चिंचवड आणि भोसरी परिसरात नायट्रोजन डायऑक्‍साइडचे प्रमाण शंभरवर पोचले आहे. हवेतील प्रदूषणाची पातळी मोजण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने भोसरीतील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इमारत आणि पिंपरी-चिंचवड महापालिका इमारतीच्या मागील बाजूस ही यंत्रणा बसविली आहे. त्यातूनच हे वास्तव पुढे आले आहे.

काय आहेत प्रदूषणाची कारणे
पुणे-मुंबई महामार्गावर दीड वर्षापासून मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. तसेच भक्‍ती शक्‍ती चौक, जगताप डेअरी याबरोबर अन्य काही भागांमध्ये ग्रेडसेपरेटर आणि उड्‌डाण पुलांची कामे जोमात सुरू आहेत. या कामांमध्ये मशिनच्या साह्याने खड्‌डे करणे, सिमेंटचे खांब उभे करणे अशा प्रकारच्या कामादरम्यान मोठ्या प्रमाणात धूलिकण निर्माण होतात. शहरातील अनेक भागांमध्ये नवीन गृहप्रकल्पांची कामेही सुरू आहेत. त्या ठिकाणीही कामाच्या दरम्यान धूलिकण निर्माण होतात. त्यामुळे हवेतील धूलिकणांच्या मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. प्रामुख्याने उन्हाळ्यात हे प्रमाण अधिक वाढते. शहरातील वाहनांची संख्या वाढली आहे. त्यात दुचाकींचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे इंधनवापरामुळे नायट्रोजन डायऑक्‍साईडच्या प्रमाणातही वाढ होते.

आरोग्याची काळजी घ्या
हवेत वाढणारे धूलिकण आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक ठरू शकतात. त्यातून श्‍वसनाशी संबंधित आजार जडण्याची शक्‍यता असते. त्यामुळे नागरिकांनी प्रवासादरम्यान आरोग्याची योग्य ती काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे.

भोसरी परिसर सर्वाधिक प्रदूषित
गेल्या वर्षी पिंपरी-चिंचवड परिसराच्या तुलनेत भोसरी परिसरात सर्वाधिक प्रदूषण राहिले आहे. जानेवारी ते मार्च आणि ऑक्‍टोबर ते डिसेंबर या कालावधीत पिंपरी-चिंचवड आणि भोसरी या दोन्ही भागांतील हवा प्रदूषित राहिलेली आहे.

वाहनांमुळे निर्माण होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे. सीएनजी बसचा वापर वाढविणे, जुन्या वाहनांच्या वापरावर बंदी घालणे, असा आराखडा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तयार केला आहे. बांधकामांमुळे निर्माण होणारी धुळीची समस्येसाठी पाण्याची फवारणी करणे, असे उपाय केल्यास प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. या संदर्भात प्रशासनाशी पत्रव्यवहार करण्यात येत असतो.
- दिलीप खेडेकर, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पियुष गोयाल आज भरणार उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT