Ajit Pawar s work useful maharashtra and ncp party Sharad Pawar politics
Ajit Pawar s work useful maharashtra and ncp party Sharad Pawar politics Sakal
पुणे

Sharad Pawar : अजित पवारांचे काम राज्य व पक्षासाठी उपयुक्त - शरद पवार

मिलिंद संगई, बारामती.

बारामती : विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे सुरु असलेले काम राज्य व राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी अतिशय उपयुक्त आहे, असे सांगत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजित पवार यांच्याच पाठीशी आपण खंबीरपणे आहोत, हे दाखवून दिले.

गेल्या काही दिवसात माध्यमांमधून अजित पवार यांच्याविषयी तसेच शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या दिलेल्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळी चर्चा झाली. या मध्ये संबंध ताणले गेल्यापर्यंत अनेकांनी निष्कर्ष काढले होते. मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज अतिशय स्पष्टपणे अशा चर्चा निरर्थक असून त्या आता थांबवा असे आवाहन केले.

बारामतीत माध्यमांशी बोलतांना त्यांनी अतिशय स्पष्टपणे अजित पवार यांच्या विषयी विविध चर्चा थांबवा असे आवाहन केले. या वेळी बोलताना पवार म्हणाले, चर्चा होतात हे खर असले तरी कधी काय घडल आहे का, असा प्रतिप्रश्न करत पवार यांनी या चर्चा निरर्थक असल्याचे नमूद केले. अजित पवार व आपली कामाची पध्दत वेगळी आहे असे सांगताना मला वेळ असेल तेव्हा मी मिडीयाला वेळ देतो,

अजित पवार मिडीया फ्रेंडली नाही हे मी तुम्हाला स्वच्छ सांगतो, काही जण नावासाठी काम करतात अजित पवार यांना प्रसिध्दीची कधीच चिंता नसते, ते हातात घेतलेले काम पूर्ण करण्यावर भर देतात, फिल्डवर कामाचा त्यांचा अँप्रोच आहे, अजित पवार हे फक्त कामच करणा-यांपैकी एक आहेत. स्वताः शरद पवार यांनीच अत्यंत स्पष्टपणे अजित पवार यांच्या बाबत भूमिका स्पष्ट केल्याने आता तरी माध्यमातून येणा-या बातम्या थांबतील, अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Nirupam: "पवारांनी काँग्रेसकडं प्रस्तावही ठेवला होता की, सुप्रिया सुळेंना..."; विलिनीकरणाच्या विधानावर निरुपम यांचा खळबळजनक खुलासा

Loksabha election 2024 : ''...तर हे राम मंदिराला कुलूप ठोकतील'', अमित शाह नेमकं काय म्हणाले?

Share Market Closing: शेअर बाजार आजही सपाट बंद; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये रिकव्हरी, कोणते शेअर्स तेजीत?

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Latest Marathi News Live Update : पवईत ४ कोटी ७० लाखांची रोकड पकडली

SCROLL FOR NEXT