पुणे

वारकऱ्यांच्या सेवेसाठी आळंदी सज्ज

विलास काटे

आळंदी (पुणे) : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त भरणाऱ्या कार्तिकी वारी सोहळ्यासाठी आळंदीत येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठीची पालिका प्रशासन आणि अन्य विभागात लगबग सुरू आहे.

आळंदी पालिकेच्या वतीने सध्या राज्य तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून शहरातील प्रमुख प्रदक्षिणा मार्गावर विद्युत दिवे नव्याने उभारण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे राज्य तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून शहरात ठिकठिकाणी बांधलेल्या शौचालयांची दुरुस्ती करून वापरासाठी उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेचा आरोग्य विभाग काम करत आहे. तात्पुरत्या स्वरूपातील शौचालये दर्शनबारी, घाट परिसर आणि शहराच्या बाहेर उभी केली आहेत. आळंदीतील चाकण चौक आणि एसटी स्थानकात भव्य बहुमजली सुलभ शौचालय वारकऱ्यांसाठी सज्ज आहे. स्वच्छ शौचालयांसाठी स्वच्छता कर्मचारी नेमले आहे.

वारकऱ्यांची गर्दी होण्यापूर्वी बुधवारपासून (ता. 20) शहरात जंतुनाशक पावडर फवारण्यात येईल. रस्त्यावरील कचरा गोळा करण्यासाठी पालिकेचे स्वच्छता कर्मचारी आणि सोबत जादाचे रोजंदारीवरील कर्मचारी लावले आहेत. स्वच्छतेसाठी मागेल त्याला घंटागाडी तसेच कचरा गोळा करण्यासाठी पुरविली जाणार आहे. तर शहरात प्लॅस्टिकला बंदी असल्याने प्लॅस्टिकचे कप, थर्माकोलच्या पत्रावळी आणि द्रोण विक्रीस बंदी आहे. राज्यभरातून वारकऱ्यांना येण्यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने एसटी स्थानकात बॅरिगेटींग उभारण्याचे काम सुरू आहे. देहूफाट्यावर पीएमपीएल आणि एसटी महामंडळाच्या गाड्या प्रवाशांच्या वाहतुकीची व्यवस्था करतील.

दरम्यान, वारकऱ्यांच्या स्नानासाठी इंद्रायणीत पाणीसाठा मुबलक आहे. वारीसाठी जादाचे पाणी सोडण्याची मागणी पालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. शहरात पिण्यासाठी विभागवार पाणी सोडण्यात येणार आहे. याशिवाय पिंपरी महापालिकेकडूनही जादाचे पाणी वारकऱ्यांसाठी मागविण्यात आले आहे.

याशिवाय वीज मंडळ, आरोग्य विभाग यांचीही तयारी पूर्ण झाली आहे. चोवीस तास आरोग्यसेवा आणि चोवीस तास अखंडित वीजपुरवठा केला जाणार आहे. वारीसाठीच्या बंदोबस्तासाठी पोलिसांची बंदोबस्त रुजू होण्यास सुरवात झाली आहे. तर शहरात अतिक्रमण कारवाई थंड झाली तरी मंदिरापुढील दुकानदारांनी स्वतःहून दुकाने मागे हटविण्यास सुरवात केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Sakal Podcast : बीड पंकजा मुंडेंना अवघड जाणार? ते ‘मर्द’ला पराभवाचा ‘दर्द’च होत नाही

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

SCROLL FOR NEXT