alot bed to Covid 19 patients in private warn PMC Pune 
पुणे

Covid 19 : रूग्णांना बेड द्या अन्यथा... महापालिकेचा खासगी हॉस्पिटलला इशारा

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुण्यात कोरोनाचे रूग्ण वाढताच, त्यांना सामावून घेण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या खासगी हॉस्पिटलच्या मनमानीवर महापालिकेने नजर रोखली आहे. 'रुग्णांना बेड दिले नाही तर ते आम्हीच ताब्यात घेऊ,' असा इशारा महापालिकेने खासगी हॉस्पिटल व्यवस्थापनाला सोमवारी दिला. त्याचवेळी येत्या दोन दिवसांत ४८७ बेड ताब्यात येतील, असा विश्वासही महापालिकेचा आहे.

शहरात कोरोनाचा संसर्ग पसरल्यानंतर खासगी रुग्णालयांत बेड उपलब्ध होत नसल्याचे दिसत आहे. परिणामी, रूग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्याच रोजच्या रूग्णसंख्येचा आकडा हा तीन हजाराच्या घरात जात आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांना विशेषतः अत्यवस्थ रुग्णांना बेड देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. तरीही, खासगी रूणालयांत ते मिळत नसल्याचे दिसत आहे.

या अनुषंगाने खासगी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींची सोमवारी बैठक झाली. महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, सहायक आरोग्य प्रमुख डॉ. मनिषा नाईक आदी उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात गरजेनुसार विविध ३० हॉस्पिटलमध्ये दीड हजाराहून अधिक बेड उपलब्ध करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. खासगी रुग्णालयांतील बेड ताब्यात घेऊन, त्याठिकाणी रुग्णांना उपचार देण्यासाठी महापालिकेने आता कडक पवित्रा घेतला आहे.

''शहरात रुग्ण वाढल्याने त्यांना सामाविण्यासाठी बेडची गरज आहे. खासगी रुग्णालयांशी चर्चा करूनही ते मिळत नसतील, तर साथरोग नियंत्रण कायद्यातून ते ताब्यात घेतले जातील. त्याआधी बेड देण्याची तयारी हॉस्पिटलने ठेवावी.''
- रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! लाडक्या बहिणींना १४ जानेवारीपूर्वी मिळणार ४५०० रुपये; नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पुढील आठवड्यात जमा होणार, वाचा...

आजचे राशिभविष्य - 20 डिसेंबर 2025

Weekend Special Breakfast : वीकेंडला सकाळी नाश्त्यात बनवा खास पदार्थ, सर्वजण करतील कौतुक

राज्य सरकारचा मोठा निर्णय; विवाहासाठी ‘या’ जोडप्यांना मिळणार आता अडीच लाख रुपये; काय आहेत अटी, कागदपत्रे कोणती लागणार, अर्ज कोठे करायचा? वाचा...

IND vs SA, 5th T20I: तिलक वर्मा-शिवम दुबे एकाच दिशेला धावले, पण रनआऊट नेमकं झालं कोण? शेवटच्या चेंडूवर गोंधळ

SCROLL FOR NEXT