mac1
mac1 
पुणे

आंबेगावच्या 40 गावांत भातपीक 50 टक्के सडले

सकाळ वृत्तसेवा

नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी

मंचर  : आंबेगाव तालुक्‍याच्या आदिवासी भागातील 40 गावांत सलग 20 दिवस झालेल्या पावसामुळे 50 टक्के भात पीक सडले आहे. यामुळे 500 एकर क्षेत्रातील भातपिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या नुकसानाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी आंबेगाव पंचायत समितीचे सदस्य संजय गवारी यांनी केली आहे.


तालुक्‍यातील कोंढवळ, गवांदेवाडी, निगडाळे, राजपूर, तळेघर, म्हातारबाचीवाडी, चिखली, जांभोरी, तर आहुपे खोऱ्यातील तिरपाड, दिगज, अडिवरे, असाणे, पांचाळे, पाटण, माळीण, बोरघर, वचपे आदी गावांत नुकसानाचे प्रमाण मोठे आहे. सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी अजूनही या भागात अधूनमधून सरी कोसळत आहेत. काही भागांत भातरोपे वाहून गेली आहेत, तर काही ठिकाणी भातपीक अजूनही पाण्यात आहे. शेतीचे बांधही पुराच्या पाण्याने वाहून गेले आहेत. अनेकांनी बॅंका व सहकारी सोसायट्यांकडून कर्ज घेतले होते. घेतलेले कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत असल्याचे शेतकरी वामन लोहकरे व हिरामण गायकवाड यांनी सांगितले.


निगडाळे, कोंढवळ भागातील शांताराम कारोटे, एकनाथ गेंगजे, गेनू लोहकरे, सुभाष मदगे, तुकाराम कुऱ्हाडे, चिंधू लोहकरे, मारुती लोहकरे, पंगाजी लोहकरे, काळू लोहकरे, विष्णू लांघी, शांताराम लोहकरे या शेतकऱ्यांच्या भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT