Amol Kolhe
Amol Kolhe  Esakal
पुणे

Sakal Saam Survey : संसदेत अभ्यासपूर्ण मांडणी पण उपस्थिती किती ? बैलगाडा शर्यतीचा प्रश्न धसाला लावणाऱ्या खासदाराचा लेखाजोखा

सकाळ वृत्तसेवा

शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठविणे आणि पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविणे, या दोन प्रश्‍नांभोवती फिरत असे. त्यातील बैलगाडा शर्यतीचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने नुकताच मोकळा केला, तर पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोडींच्या प्रश्‍नावर उतारा ठरणाऱ्या पाच बाह्यवळणांची कामे मार्गी लागली आहेत. तरीही वाहतुकीचे काही प्रश्‍न अजूनही रखडेलेले आहेत.

मतदारसंघातील प्रश्‍न अभ्यासपूर्ण मांडणी करून सोडविण्यावर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भर दिल्याचे दिसून येत आहे. तसेच, वैविध्यपूर्ण प्रकल्प मतदारसंघात करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातून त्यांना दोन वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने गौरविले आहे.

बैलगाडा शर्यत

बैलगाडा शर्यतीभोवती शिरूरचे राजकारण फिरते. त्यामुळे खासदार कोल्हे यांनी बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठविण्यासाठी संसदेत आवाज उठवला. बैलांची धावण्याची क्षमता व अन्य शारीरिक बाबींचा अभ्यासपूर्ण अहवाल राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात मांडावा, यासाठी महाविकास आघाडी सरकारकडे आग्रह धरला. देशी खिलार जातीचा गोवंश नष्ट होतोय, याकडे लक्ष वेधले. अखेरीस न्यायालयाने आधी तात्पुरती आणि आता कायमस्वरूपी बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली.

वाहतूक कोंडी

नाशिक महामार्गावरील सहा बाह्यवळणांची कामे पूर्ण झाली असली, तरी या रस्त्यावरील चाकण चौक परिसर आणि पुणे-नगर महामार्गावरील वाघोली ते शिक्रापूर आणि पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसर ते उरुळी कांचन या परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्‍न कायम आहे. तसेच पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे अजूनही कामाच्या ट्रॅकवर आलेली नाही.

पुणे-नाशिक, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि पुणे-शिरूर या तीनही राष्ट्रीय महामार्गाच्या एलिव्हेटेड रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी पुणे-नाशिक रस्त्याचा डीपीआर मंजूर झाला आहे, तर उर्वरित दोन्ही रस्त्यांचे डीपीआर बनविण्याचे काम सुरू आहे.

‘इंद्रायणी मेडिसिटी’

कोरोना काळात ‘इंद्रायणी मेडिसिटी’ या अत्यंत महत्त्वपूर्ण प्रकल्पाची कोल्हे यांनी मांडणी केली. त्यात १९ मल्टिस्पेशालिटी रुग्णालये आणि ६ वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश असणार आहे. या प्रकल्पातून सुमारे १५ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. कोविड काळात कोल्हे यांनी मतदारसंघातील ५ लाख नागरिकांच्या लसीकरणाची मोहीम राबवली. ११२५ ज्येष्ठ नागरिकांना ३ कोटींहून अधिक रकमेची श्रवणयंत्र मोफत वाटली. रक्तदान शिबिरांचे आयोजन केले.

इतर प्रश्‍न व प्रकल्प

शिरूर लोकसभा मतदारसंघात आदिवासींची संख्याही मोठ्या प्रमाणात आहेत. या आदिवासी बांधवांसाठी राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र हा प्रकल्प मांडला आहे. त्याचा डीपीआर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आयुष मंत्रालयाकडे सादर केलेला आहे. शिवनेरीवरील शिवसृष्टी आणि किल्ले शिवनेरीवरील रोपवे विकसित करण्याची सरकारला विनंती केली आहे. ‘रेड झोन’चा प्रश्‍‍न सोडविण्यासाठी ‘वन नेशन वन रेड झोन’चे निकष लागू करण्यासाठीविनंती केली.

६० टक्के संसदेतील उपस्थिती

५४१ विचारलेले प्रश्न

२६ चर्चांमध्ये सहभाग

निवडणुकीत दिलेली प्रमुख ३ आश्वासने ४ वर्षांतच पूर्ण केली. संसदेत शेतकरी, रेडझोन बाधित, मतदारसंघातील प्रलंबित प्रकल्पांबाबत प्रश्न मांडले आहेत. ४ वर्षांत विकासाची बऱ्यापैकी पायाभरणी केली आहे. मतदारसंघात सेमी हायस्पीड रेल्वे, राष्ट्रीय महामार्गांसह विविध माध्यमांतून सुमारे ४७ हजार कोटींची कामे मंजूर आहेत.

- डॉ. अमोल कोल्हे, खासदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT