Amol-Palekar
Amol-Palekar 
पुणे

आपण अंधाराचे बळी झालो - अमोल पालेकर

सकाळवृत्तसेवा

पुणे - २०१४च्या आधीचा संधिकाल ओळखायला आपण चुकलो. त्यामुळे आज अंधाराचे बळी झालो असून, दहशतवादाच्या विळख्यात सापडलेलो आहोत, अशी खंत अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी आज येथे व्यक्त केली. 

महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे (अमेरिका) केशव गोरे स्मारक ट्रस्ट (मुंबई) आणि साधना ट्रस्ट (पुणे) यांच्या सहकार्याने दिल्या जाणाऱ्या साहित्य व समाजकार्य पुरस्कार वितरण समारंभावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

या वेळी पालेकर यांच्या हस्ते सामाजिक क्षेत्रात परिवर्तनवादी काम करणाऱ्या ‘आनंदवन’ संस्थेला ‘समाजकार्य जीवनगौरव’ पुरस्कार देण्यात आला. संचालक डॉ. विकास आमटे यांनी तो स्वीकारला. पंजाबमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करणाऱ्या ‘तर्कशील सोसायटी’ या संस्थेला ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष राजिंदर भदौठ यांनी तो स्वीकारला.

साहित्यिक दिलीप चित्रे यांच्या स्मृतिनिमित्त अनुवादिका आणि लेखिका शांता गोखले यांना साहित्य जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले; तसेच लेखिका सानिया (साहित्य वाड्‌.मय), नाटककार राजीव नाईक (रा. शं. दातार नाट्य पुरस्कार), हरी नरके (समाजप्रबोधन), सामाजिक कार्यकर्त्या निशा शिवूरकर (कार्यकर्ता पुरस्कार, असंघटित कष्टकरी) आणि मतीन भोसले (कार्यकर्ता पुरस्कार, सामाजिक प्रश्‍न) यांना पुरस्कार देण्यात आले. लेखक प्रवीण बांदेकर यांच्या ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या कादंबरीला ‘ललित ग्रंथ’ पुरस्कार देण्यात आला. 

केंद्र सरकारने कुष्ठरुग्ण विभाग बंद केला आहे. कुष्ठरुग्णांना बोटे नसल्याने आनंदवनात फक्त एक आधार कार्ड आहे. आनंदवनात येण्याऱ्यांची संख्या कमी करून आनंदवन बंद करण्याकडे आमची वाटचाल आहे.
- डॉ. विकास आमटे, संचालक, आनंदवन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

SCROLL FOR NEXT