An elderly couple receives electricity bill of Rs 58670 msedcl pune Sakal
पुणे

Electricity Bill : वृद्ध दाम्पत्याला वीज बील चक्क ५८ हजार ६७० रुपये

हवेसाठी एक पंखा आणि उजेडासाठी अवघे दोन बल्ब इतकाच वापर आणि वृद्ध दाम्पत्याला वीज बिल चक्क ५८ हजार ६७० रुपये असा अजब कारभार महावितरणचा पहावयास मिळत आहे.

नवनाथ भेके

निरगुडसर : हवेसाठी एक पंखा आणि उजेडासाठी अवघे दोन बल्ब इतकाच वापर आणि वृद्ध दाम्पत्याला वीज बिल चक्क ५८ हजार ६७० रुपये असा अजब कारभार महावितरणचा पहावयास मिळत आहे.

खडकी (ता.आंबेगाव) येथील गणेशवाडी येथे दत्तू कुशाबा पोखरकर(८३) व पार्वताबाई दत्तू पोखरकर (८०) हे वृद्ध दाम्पत्य आपल्या मुली समवेत राहतात.त्यांनी छोट्या घराची उभारणी केल्यानंतर पार्वताबाई दत्तू पोखरकर यांच्या नावे १६ जून २०२२ रोजी नवीन मीटर बसवला या बिलापोटी पोखरकर यांनी १८ जुलै २०२३ रोजी ५ हजार रुपये आणि त्यानंतर २०० आणि २२० अशी बिले भरली.

आज रोजी मीटर वर १९२ रीडिंग आहे आणि बिल चक्क ५८ हजार ६७० वर पोहचले आहे.महावितरणच्या अशा अनागोंदी कारभारामुळे वृध्द दाम्पत्याला नाहक त्रास होत आहे तसेच अनेक घरगुती वीज ग्राहकांना देखील बिले भरमसाठ आली असून याबाबत महावितरणने वाढीव बिलांची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.

पिंपळगाव खडकी (ता.आंबेगाव) येथील वीज उप केंद्राचे अभियंता गर्जे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पार्वताबाई दत्तू पोखरकर यांना वाढीव आलेल्या बिलाची पुढील येणाऱ्या बिलात दुरुस्ती होऊन वाढीव आलेले बिल कमी करण्यात येईल. फोटो खाली ओळ: गणेशवाडी-खडकी (ता.आंबेगाव ) येथील पार्वताबाई दत्तू पोखरकर यांना आलेले ५८ हजार ६७० बिल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Andre Russell Retirement: वेस्ट इंडिजचा 'ऑलराउंडर' आंद्रे रसेलने केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर!

Delhi to Goa flight emergency Landing: मोठी बातमी! दिल्ली ते गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

SCROLL FOR NEXT