Anand jadhav
Anand jadhav Sakal
पुणे

दररोज सायकलने ६५ किलोमीटरचा प्रवास

सकाळ वृत्तसेवा

आनंद जाधव हे शिक्षक दररोज मुरबाड ते कल्याणपर्यंत कामासाठी सायकलवरूनच प्रवास करतात.

आनंद जाधव हे शिक्षक दररोज मुरबाड ते कल्याणपर्यंत कामासाठी सायकलवरूनच प्रवास करतात. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यात आपलं छोटंसं योगदान असावं, या उद्देशाने तीन वर्षांपासून ते हा नियम पाळतात. शाळेला सुटी असेल तेव्हा ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ‘प्रदूषण करणारी वाहनं टाळा, सायकल वापरा,’ या संकल्पनेचा प्रसार करतात.

ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यामधील काटेमानिवली येथे जाधव राहतात. ते मुरबाडच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात उपमुख्याध्यापक आहेत. ५४ वर्षे वयाचे जाधव तीन वर्षांपासून सायकलने दररोज ६५ किलोमीटरचा प्रवास करतात. ते म्हणाले ‘‘मागील तीन वर्षं, तीन महिन्यांच्या कालावधीत मी एकंदरीत ३५ हजार किलोमीटरचा प्रवास सायकलवरून पूर्ण केला आहे. लहानपणापासूनच सायकलची आवड होती. तिला पर्यावरण संरक्षणासाठी भरीव काही करण्याच्या विचाराची जोड मिळाली. त्यामुळे कामाच्या ठिकाणी सायकलनेच ये-जा करण्याचा परिपाठ सुरू झाला. शाळकरी वयात बाबांची सायकल चालवायला शिकलो होतो. ती बरेचदा चालवायचो. नोकरी लागल्यावर स्वतःची सायकल प्रथमच विकत घेण्याचा आनंद अनुभवला. ती अधूनमधून चालवायचो. काही वर्षांपूर्वी जास्त सोयिस्कर सायकल घेतली. ती मात्र दररोज १५ ते २० किलोमीटर चालवू लागलो. कारण त्यातील फायदे प्रकर्षाने जाणवू लागले. प्रवास खर्चाची बचत, व्यायाम या वैयक्तिक लाभांबरोबरच इंधन बचत तसेच रहदारी व प्रदूषण हे सामाजिक फायदे फार महत्त्वाचे आहेत.’’

जाधव म्हणाले, सायकल चालवण्याच्या आवडीमुळे तिच्या सफरींमधील वैविध्याकडे आपसूकच लक्ष जाऊ लागलं. ‘सायकल टू वर्क,’ या समूहाशी जोडला गेलो. सायकल मित्र संमेलनात हजेरी लावली. अनेक सायकलप्रेमींची ओळख झाली. कल्याण ते गोवा आणि कल्याण ते हैदराबाद सायकल प्रवास करत, गावोगावी ‘प्रदूषणमुक्तीसाठी सायकल चालवा,’ असं आवाहन केलं. गरजू दिव्यांगांना कृत्रिम पाय मोफत बसवता यावेत, यासाठी निधी संकलनाच्या हेतूने एका मोहिमेत सहभागी झालो. त्या अंतर्गत कल्याण ते गोवा हा प्रवास कोकणातून सागरकिनारी मार्गाने केला. तेव्हाचा थरारक अनुभव पुढच्या अशाच लहानमोठ्या सामाजिक मोहिमांसाठी ऊर्जा देणारा ठरला.

कधी एखाद्या समूहाबरोबर तर कधी एकट्यानेच वेगवेगळ्या ठिकाणी सायकलने प्रवास करून, त्याबद्दलचे फायदे लोकांपर्यंत पोहोचवत असतो.

- आनंद जाधव, शिक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Hemant Karkare: अन् करकरेंच्या पत्नीने नाकारले मोदींचे एक कोटी रुपये, 16 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

Jalgaon Summer Heat : मतदान केंद्रावर मिळणार ‘ग्लुकोज-डी, ओआरएस, बीपी, शुगर’ची गोळी; मतदारांनो, बिनधास्त पडा घराबाहेर

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

SCROLL FOR NEXT