navale bridge
navale bridge Esakal
पुणे

navale bridge: नवले पुलावरील अपघातांसाठी तुम्ही तर ठरत नाही ना कारणीभूत? वाचा नेमकं कुठं होतीये गडबड

अंकिता खाणे (Ankita Khane)

नवले पूल पुण्यात अनेकदा चर्चेत येणारा विषय आहे. तर त्याच कारण म्हणजे पुलावर होणारे अपघात. दरम्यान आतापर्यंतचा भयानक अपघात म्हणता येईल असा अपघात काल नवले पुलावर घडला. साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकचा काल रविवारी रात्री पावणेनऊ वाजता नवले पुलाजवळ ब्रेक निकामी झाला. त्यामुळे चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या तब्बल २४ वाहनांना अक्षरशः उडविले. या भीषण अपघातात ८ ते १० जण गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात कार, रिक्षा, दुचाकी अशा वाहनांचा चक्काचूर झाला. या घटनेमुळे महामार्गावर ४ ते ५ किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नवले पुल अपघातांचा हॉटस्पॉट ठरत आहे. वारवार या ठिकाणी अपघात होतात. याबातची कारणे आपण जाणून घेऊया.

हेही वाचा: Shraddha Walker Case: वेबसीरीज ठरतेय का गुन्ह्यांचं गाइडबुक?

नवले पुलावर होणाऱ्या अपघातांची प्रमुख कारणे

१. कात्रज बोगद्यापासून नवले पुल पर्यंत रस्त्याची चुकीची रचना. या उतारावर अवजड वाहनांची नियंत्रण सुटतं. अवजड वाहने गाड्या डिझेल वाचवण्यासाठी गाड्या न्युट्रल करतात याचमुळे पुढे जाऊन गाड्यांचे ब्रेक अचानक लागत नाहीत

२. वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी स्पीड गन बसवण्यात आली आहे मात्र स्पीड गन दिसल्यावर वाहनांचा स्पीड अचानक कमी होतो परिणामी मागच्या गाड्या येऊन पुढील वाहनांना जोरदार धडक देतात

३. या महामार्गाचे रखडलेले सहा पदिरकरण हा गंभीर प्रश्न. रिलायन्स इन्फ्रा ani NHAI (national highway authority of india) मध्ये या रस्त्या संदर्भात करार करण्यात आला होता. २०१३ मध्ये या रस्त्याचे ६ पदरीकरण होणार होते मात्र अद्याप याचे काम सुरू झालेले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT