bike rally sakal
पुणे

सैन्यदलाच्या वतीने महाराष्ट्र ते जम्मू-काश्‍मीर ‘बाईक रॅली’चे आयोजन

स्वातंत्र्याच्‍या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सैन्यदलातर्फे बाईक रॅली आयोजित

अक्षता पवार : सकाळ वृत्तसेवा

पुणे : सैन्यदलाच्या २८ इनफन्ट्री डिव्हिजनच्या वतीने महाराष्ट्र ते जम्मू-काश्‍मीर अशा आगळ्यावेगळ्या ‘बाईक रॅली’चे आयोजन केले होते. या उपक्रमांतर्गत नाशिक ते जम्मू-काश्‍मीरच्या मच्छल गावातील नियंत्रण रेषेपर्यंत, तीन दिवसांचा हा उपक्रम उत्साहात पार पडला. यामध्ये एकूण ६० दुचाकीस्वारांनी सहभाग घेतला. यातील ४५ दुचाकीस्वार मच्छल येथील स्थानिक होते. स्थानिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, तसेच मच्छल या भागाला साहसी पर्यटनस्थळ म्हणून ओळख मिळावी, या अनुषंगाने हा उपक्रम सैन्यदलाद्वारे राबविण्यात आला.

स्वातंत्र्याच्‍या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सैन्यदलातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून ही बाईक रॅली आयोजित केली होती. या मोहिमेत नाशिक येथून १५ दुचाकीस्वारांनी सुमारे अडीच हजार किलोमीटरचा प्रवास केला. या प्रसंगी सैन्यदलाच्या वतीने रमजाननिमित्त दुचाकीस्वार आणि स्थानिकांसाठी इफ्तारचेदेखील नियोजन करण्यात आले.

खेळ, साहसी उपक्रम आणि इतर उपक्रमांची कमतरता यामुळे अशा दुर्गम भागामधील नागरिकांचे मानसिक व शारीरिक विकासावर परिणाम होत असून, दैनंदिन उपजीविकेसाठी आवश्यक पायाभूत सुविधांपासून स्थानिक वंचित आहेत. ही समस्या पाहता सैन्यदलातर्फे मच्छल या दुर्गम गावातील स्थानिकांसाठी विविध उपक्रम, मदतकार्य तसेच, त्यांना आवश्‍यक त्या सुविधा पुरविण्यात येत आहेत. येथील पर्यटनाला चालना मिळाल्यास स्थानिकांना उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध होइल, असा विश्‍वास सैन्यदलाने व्यक्त केला आहे.

दरम्यान, जून महिन्यात मच्छल येथे महिला व मुलींसाठी बाईक व कार रॅली, तसेच मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येणार आहे. येथील महिला मुलींमध्ये आत्मविश्‍वास वाढावा व महिलांनादेखील आपल्या शक्तीचे प्रदर्शन करता यावे, यासाठी हा उपक्रम ठेवला जाणार असल्याचे सैन्यदलातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT