Arrested thief who used to travel by plane for theft in pune 
पुणे

'तो' विमानाने पुण्यात यायचा अन् चोरी करुन जायचा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : 'तो' हैद्राबाद येथून विमानाने पुण्यासह अन्य राज्यातील  मोठ्या शहरात जात होता. त्या-त्या शहरात त्याचे साथीदार त्याला भेटत असे. त्यानंतर उच्चभ्रू सोसायटीतील सदनिकामध्ये चोरी करुन 'तो' त्याच दिवशी पुन्हा स्वगृही परतत असे. अशा या 'हायप्रोफाईल' चोरटयाने शहरातील 82 चोरीसह तब्बल 127 गुन्हे केले आहे, त्यातून तब्बल 37 लाख 73 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

अरे कारट्या काय केलंस हे! खेळता खेळता मुलानेच आईला...

मुन्ना उर्फ सलीम कुरैशी (वय 46, रा.गोवंडी, मुंबई, मूळ रा. हैद्रबाद) असे अटक केलेल्या चोरटयाचे नाव आहे. याबरोबरच चोरी केलेला माल विक्री करणाऱ्या शरीफ मोहम्मद ख्वाजा मैनुद्दीन शेख, बिलाल उर्फ अशोक गोविन्द प्रधान, अब्दुल सत्तार मोहम्मद नजीर अहमद सत्तार, मोघल अन्वर अली करीम बेग, प्रभु कल्लापा नजवंडे (सर्व रा. हैद्रबाद) यांना ही अटक करण्यात आले आहे. 

सलीम हा मुळचा हैद्रबाद येथील रहिवासी आहे. तो विमानाने किंवा त्याच्या आलिशान कारने पुण्यात येत असे. त्यानंतर ईश्वर शिंदवळ यास जोडीला घेऊन शहरातील उच्चभृ सोसायटीतील सदनिकामध्ये चोरी करीत असे. त्यानंतर हैद्रबाद येथे जाऊन तेथील साथीदारांमार्फत सोने-चांदी, अन्य दागिने व वस्तु विक्री करीत असे. 

कुरेशीने एकूण 127 गुन्हे केले आहेत. त्यापैकी पुण्यात 82 चोरीचे गुन्हे केले, उर्वरित 47 गुन्हे मुंबई, दिल्ली व हैद्रबाद येथे करीत असे. त्याचयाकडुन 830 ग्रैम सोने, 6 किलो 275 ग्रैम चांदीसह 37 लाख 73 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पुण्यात पेस्ट कंट्रोलमुळे दाम्पत्यचा मृत्यू; वाहतूककोंडीही मृत्यूस जबाबदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जस्टिस यशवंत वर्मा प्रकरणात 'एफआयआर'ची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली; कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Asian Games 2026: १३ वर्षांच्या शाळकरी मुलीनं जिंकलं 'Gold'; भल्याभल्यांना जे नाही जमलं, ते करून दाखवलं

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

SCROLL FOR NEXT