पुण्यात पेस्ट कंट्रोलमुळे दाम्पत्यचा मृत्यू; वाहतूककोंडीही मृत्यूस जबाबदार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

घरात पेस्ट कंट्रोल केल्यानंतर रात्री घरात झोपलेल्या दाम्पत्याच्या शरीरात पेस्ट कंट्रोलचे विषारी औषध श्वासावाटे शरीरात गेल्याने पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री बिबवेवाडी परीसरामध्ये घडली.

पुणे : घरात पेस्ट कंट्रोल केल्यानंतर रात्री घरात झोपलेल्या दाम्पत्याच्या शरीरात पेस्ट कंट्रोलचे विषारी औषध श्वासावाटे शरीरात गेल्याने पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री बिबवेवाडी परीसरामध्ये घडली. दरम्यान, रुग्णवाहिका पाऊण तास रस्त्यात अडकली. वाहतूक कोंडीमुळे त्यांना वेळेत उपचार मिळाले नसल्याचे नागरीकांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अपर्णा मजाली (वय 54), अरविंद मजाली (वय 64) असे या घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. मजाली यांच्या घरी मंगळवारी सकाळी 11 वाजता पेस्ट कंट्रोल केले होते. त्यानंतर ते दोघे संपूर्ण दिवस त्यांच्या नातेवाइकांकडे राहिले. सायंकाळी 7 वाजता ते पुन्हा घरी परतले. दरम्यान, त्यांनी दरवाजे व खिडक्या उघडुन पेस्ट कंट्रोलच्या विषारी औषध बाहेर काढले नाही. त्यानंतर काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटु लागले. साडेसात वाजता त्यांची मुलगी घरी आली, त्यावेळी तिला दोघेही बेशुद्ध अवस्थेत आढळले, तिने शेजाऱ्यांच्या मदतीने तत्काळ खासगी रुग्णलयात हलविले. मात्र त्यांची प्रकृती नाजुक असल्याने त्यांना अन्य रुग्णलयात हलविन्यास सांगण्यात आले. 

Coronavirus : कोरोनामुळे अनेकजण चिंताग्रस्त; मृतांची संख्या...

दरम्यान, दोघांना उपचारासाठी एक किलोमीटर अंतरावर असलेल्या दुसऱ्या खासगी रुग्णलयात दाखल करन्यासाठी रुग्णवाहिका नेले जात होते. त्यांच्या घरापासून 5 मिनिटे अंतरावर होते. मात्र रुग्णवाहिका बराच वेळ वाहतूक कोंडीमध्ये अडकली. त्यामुळे त्यांना वेळेत उपचार मिळाले नाहीत. रुग्णलयात दाखल झाल्यानंतर डॉक्टरनी त्यांना मृत घोषित केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Couple died due to pest control in Pune