हात सोडून 'बाईक' चालवणे जिवावर बेतले:दोन तरुणांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

संतोष व ओम हे पुणे नाशिक महामार्गावरून आळेफाट्याच्या दिशेने निघाले होते. येडगावच्या हद्दीत हॉटेल सुगरण जवळ दुचाकीची (एमएच 16 सीएल 3730) धडक महामार्गावरील दुभाजकाला बसली.

नारायणगाव : येथील पुणे नाशिक महामार्गावर येडगाव (ता. जुन्नर)च्या हद्दीत दुचाकीची डिव्हायडरला धडक बसून झालेल्या अपघातात नगर येथील दोन तरुण ठार झाले. अपघात मंगळवारी (ता.11) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झाला.

पुणे : नवी पेठेत रात्रीच्या वेळी पायी जाणाऱ्या तरुणीचा विनयभंग 

हात सोडून दुचाकी चालवत असल्याने गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी सांगितले. संतोष सुभाष साठे (वय 22), ओम प्रशांत बारगजे (वय 23) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. 

पुण्यात पेस्ट कंट्रोलमुळे दाम्पत्यचा मृत्यू; वाहतूककोंडीही मृत्यूस जबाबदार

तोष व ओम हे पुणे नाशिक महामार्गावरून आळेफाट्याच्या दिशेने निघाले होते. येडगावच्या हद्दीत हॉटेल सुगरण जवळ दुचाकीची (एमएच 16 सीएल 3730) धडक महामार्गावरील दुभाजकाला बसली. अपघातात गंभीर जखमी झाल्याने दोघांचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाला. हे तरुण हात सोडून भरधाव वेगाने दुचाकी चालवत असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. 

पुणे : वाहतूक नियमांचे केले उल्लंघन; झाला तब्बल ७० हजारांचा दंड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two boys die in a road accident on Pune Nashik Highway