‘आयर्न मॅन’ कौस्तुभ राडकर आपली आई, ज्येष्ठ व्हायोलिनवादक  डॉ. नीलिमा राडकर यांच्यासह.
‘आयर्न मॅन’ कौस्तुभ राडकर आपली आई, ज्येष्ठ व्हायोलिनवादक डॉ. नीलिमा राडकर यांच्यासह. 
पुणे

Video : आई - मुलाच्या एकाच वेळी पीएच.डी.तील गंमत

नीला शर्मा

शारीरिक व मानसिक सामर्थ्याची कसोटी पाहणाऱ्या, जगातील सर्वांत कठीण अशा ‘आयर्न मॅन’ स्पर्धेत आतापर्यंत पंचवीस वेळा यश मिळवलेले डॉ. कौस्तुभ राडकर हे एकमेव भारतीय आहेत. त्यांच्या आई डॉ. नीलिमा राडकर या ज्येष्ठ व्हायोलिनवादक आहेत. दोघांनी आपापल्या अभ्यासविषयात काही वर्षांपूर्वी एकाच वेळी पीएच.डी. पदवी प्राप्त केली. ते बहरलेले क्षण हे दोघे आजही पुढच्या वाटचालीत परस्परांना उमेद देण्यासाठी वारंवार आठवत असतात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कौस्तुभ म्हणाले, ‘‘माझं पदवीपासूनचं सगळं शिक्षण अमेरिकेत झालं. तिथेच ‘हृदय विकारग्रस्त व कर्करुग्णांचं पुनर्वसन करण्यात आहार आणि व्यायामाचं योगदान’ या विषयात मी पीएच.डी.चा अभ्यास केला. त्याचवेळी आई पुण्यात ‘भारतात व्हायोलिन वाद्याचं स्थान आणि व्हायोलिनवादक कलाकारांचं त्यातील योगदान’ या विषयात पीएच.डी.साठी मेहनत करत होती. मला तिचा अभिमान यासाठी वाटतो की, वयाच्या पन्नाशीनंतर ती याकडे वळली होती. घरसंसार, मी आणि माझ्या बहिणीला लहानाचं मोठं करणं यात ती आधी गुंतलेली होती. आमच्या जबाबदाऱ्या थोड्या कमी झाल्यावर तिने घरातलं सगळं करत, चिकाटीने तिचा अभ्यास पूर्ण केला.’’

नीलिमाताई यांनी सांगितलं की, मी आणि कौस्तुभ त्या कालावधीत फोनवर बोलून एकमेकांना प्रोत्साहन द्यायचो. अभ्यासासाठी लागणारी एकाग्रता, जिद्द, आव्हान पेलण्याची ताकद परस्परांमध्ये तेवत ठेवायचो. कौस्तुभने माझ्यापेक्षा उशिरा सुरवात करूनही लवकर पीएच.डी. मिळवली. हा माझ्यासाठी सुखद धक्का होता. दोघांना एकाचवेळी ही पदवी मिळाल्याबद्दल पुण्यात तो आल्यावर आनंद साजरा करायचं ठरवलं होतं. माझ्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक सांगीतिक मैफल केली. त्या निमित्ताने आमच्या यशाचा आनंदही साजरा झाला. ते बहरलेले क्षण आजही आमच्यासाठी सतत ताजे असतात. कौस्तुभने अवघ्या दहा वर्षांत पंचवीस वेळा ‘आयर्न मॅन’ स्पर्धा जिंकण्याचा विक्रम केला आहे. तो त्याच्या आणि मी माझ्या क्षेत्रात पुढे जाताना पीएच.डी.च्या वेळी आम्ही परस्परांची उमेद वाढवल्याची आठवण आजही एकमेकांना करून देत असतो. त्याच्या तालमीत तयार झालेल्या विविध वयोगटातील श्‍यहाण्णव स्त्री-पुरुषांनी आतपर्यंत आयर्न मॅन स्पर्धेत यश मिळवलं आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

T20 World Cup 2024: 'हार्दिकच्या जागेसाठी मोठी चर्चा, तर सॅमसन...', टीम इंडिया निवडीवेळी काय झालं, अपडेट आली समोर

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौची सामन्यावर पकड, स्टॉयनिस अन् दीपक हुड्डा लढवला किल्ला

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

SCROLL FOR NEXT