Ashok Saraf sakal
पुणे

अशोक सराफ यांच्या खुमासदार आठवणींनी रंगली सायंकाळ

अक्षरधारा बुक गॅलरीच्या ५९८ व्या दीपावली शब्दोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याचे. यावेळी सराफ यांच्या ‘मी बहुरूपी’ या आत्मकथनाच्या निमित्ताने प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी त्यांची मुलाखत घेतली.

सकाळ वृत्तसेवा

अक्षरधारा बुक गॅलरीच्या ५९८ व्या दीपावली शब्दोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याचे. यावेळी सराफ यांच्या ‘मी बहुरूपी’ या आत्मकथनाच्या निमित्ताने प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी त्यांची मुलाखत घेतली.

पुणे - सुनील गावस्कर यांच्यासह बालपणी नाटकात केलेले काम... प्रॉम्प्टिंग करताना थेट नाटकातच मिळालेली संधी... जयमाला शिलेदार यांच्यासह गाणे म्हणताना झालेली फजिती... एका नाटकाच्या प्रयोगाआधी खाटिकांनी केलेला सत्कार... दादा कोंडके, निळू फुले, लक्ष्मीकांत बेर्डे अशा दिग्गजांचे रंजक किस्से... आणि अंगावर काटा आणणारी पद्मिनी कोल्हापुरे यांनी दिलेली दाद! ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी सांगितलेल्या अशा एकसे एक किस्से आणि आठवणींमध्ये शनिवारची सायंकाळ रंगली.

निमित्त होते, अक्षरधारा बुक गॅलरीच्या ५९८ व्या दीपावली शब्दोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याचे. यावेळी सराफ यांच्या ‘मी बहुरूपी’ या आत्मकथनाच्या निमित्ताने प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी त्यांची मुलाखत घेतली. ते म्हणाले, ‘राजा गोसावी आणि पद्मिनी कोल्हापुरे यांनी दिलेली दाद विशेष लक्षात राहिली. ‘तुम्ही इंडस्ट्रीत फार उशिरा आलात’, असे राजा गोसावी यांनी म्हणताच मी निःशब्द झालो होतो. तर, ‘तुम्ही चांगले काम करता. पण हे म्हणणे म्हणजे लता मंगेशकर चांगल्या गातात, असे म्हणण्यासारखे आहे’, हे कोल्हापुरे यांचे उद्गार ऐकून माझ्या अंगावर काटाच आला.’’

व्यक्तिरेखेचा अभ्यास कसा करता, या प्रश्नाचे उत्तर देताना सराफ म्हणाले, ‘‘व्यक्तिरेखेचा प्रवास सर्वप्रथम विचारात घ्यावा लागतो. समोर कोण आहे, व्यक्तिरेखेचे एकंदर कथेतील स्थान काय आहे, ती पूर्ण होत आहे की नाही, त्याचा शेवट काय, या सगळ्याचा विचार करावा लागतो.’’ लोकप्रिय झालेल्या ‘हम पाँच’मधील भूमिकेसाठी मनोहर कहानियाचे अंक घेऊन वाचत असे, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

यावेळी ‘मी बहुरूपी’ पुस्तकाच्या शब्दांकनकर्त्या मीना कर्णिक, ग्रंथाली प्रकाशनाचे सुदेश हिंगलासपूरकर, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, मांडके हिअरिंग सर्व्हिसेसच्या डॉ. कल्याणी मांडके, राजहंस प्रकाशनाचे डॉ. सदानंद बोरसे आदी उपस्थित होते. ‘अक्षरधारा’च्या रसिका राठीवडेकर यांनी प्रास्ताविक केले.

‘दुय्यम भूमिकांची अपरिहार्यता’

‘मराठी नट हिंदी चित्रपटात दुय्यम भूमिका स्वीकारतात, यावर टीका होते. मराटी नटांना दुय्यमच भूमिका येतात, यामागे बरीच कारणे आहेत. पण नटांचीही अपरिहार्यता असते, त्यांनाही घर चालवायचे असते, चरितार्थ असतो. ही पार्श्वभूमी लक्षात घ्यायला हवी’, याकडे अशोक सराफ यांनी लक्ष वेधले.

अशोक सराफ म्हणाले...

- अभिनय शिकवून येत नाही, तो उपजत असावा लागतो

- नुसती स्टाईल महत्त्वाची नाही, व्यक्तिरेखा कशी साकारता ते महत्वाचे

- ‘डार्लिंग डार्लिंग’पासून मी मराठीत स्लॅपस्टिक कॉमेडी सुरू केली

- संहिता पूर्ण वाचूनच भूमिका निवडतो

- चांगलं काम करण्यासाठी नटाला आत्मविश्वास असणे गरजेचे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT