#AtHomeWithSakal challenge now for men  
पुणे

#AtHomeWithSakal या स्पर्धेत आता पुरुषांसाठी चॅलेंज

सकाळन्यूजनेटवर्क

पुणे: आपण पाहतोय की सध्या कोरोनाचं संकट संपूर्ण जगावर आहे. आपल्या देशातही खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच घरात कंटाळले आहेत.

त्यामुळे साहजिकंच घरी बसलेल्या प्रत्येकाला प्रश्न पडलाय की घरात बसून नेमकं करावं तरी काय? पण डोन्ट वरी तुमच्या या सेल्फ क्वारंटाईन काळामध्ये सकाळ माध्यम समुह तुमच्यासोबत आहे. बरं आता विचार करत असाल सोबत म्हणजे नेमका कसा? तर हो आम्ही आता दररोज तुमच्यासोबत असणार आहोत. विचार करा जर तुम्हाला या काळात घर बसल्या बक्षिसं मिळणार असं सांगितलं तर तुम्ही काय कराल? बरोबर अगदी तेच करायचं आहे. कारण आम्ही कुटुंबातल्या प्रत्येकाचा कंटाळा घालवण्यासाठी घेऊन आलो आहोत सकाळची अनोखी स्पर्धा ज्याचं नाव आहे #AtHomeWithSakal.

#AtHomeWithSakal या स्पर्धेत आज पुरुषांसाठी चॅलेंज आहे

पुरुष आणि आरोग्य हे समीकरण जीम शिवाय पूर्ण होऊ शकतंच नाही. काही पुरुष त्यांच्या स्वास्थ्याकडे लक्ष देण्यासाठी न चुकता जीमला जातात तर काही पुरुषांना असतो जीमला जाण्याचा कंटाळा. त्यामुळे अशा दोन्ही गटांचा विचार करुन आम्ही घेऊन आलो आहोत सुर्यनमस्कार चॅलेंज. सध्या लॉकडाऊनमुळे जीम बंद असलेल्यांसाठी आणि जीमला जाण्याचा कंटाळा करणा-यांसाठी सूर्यनमस्कार हा स्वतःला फीट ठेवण्यासाठी एकदम परफेक्ट मार्ग आहे. तर तुम्हाला यात १० सुर्यनमस्कार व्यवस्थित घालून याचा एक व्हिडिओ बनवायचा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या एका मित्राला टॅग करुन त्याला देखील हे चॅलेंज द्यायचं आहे. आम्हाला टॅग करुन  #AtHomeWithSakal वापरुन शेअर करायचा आहे..यातील विजेत्याला मिळणार आहे आकर्षक बक्षिस.

चला तर मग आता आम्ही तुमच्या व्हिडिओची वाट पाहतो आहे...पुन्हा भेटूच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: लोकांनी ऊर्जामंत्र्यांना विचारले २४ तासांत फक्त ३ तास ​​वीज मिळते... मंत्री म्हणाले जय श्रीराम... व्हिडिओ व्हायरल

Pune Cyber Police : नवीन सायबर ठाण्यांच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी : आमदार सिद्धार्थ शिरोळे

Tobacco Ban: तंबाखूच्या बेकायदेशी विक्रीवर आणणार प्रतिबंध; ‘वर्ल्ड ॲन्टी काउंटर फिटिंग डे’निमित्त ‘पीएमआय इन इंडिया’चा मनोदय

Marathi Kannad : 'मराठी घरातच बोलायची, अंगणवाडीत चालणार नाही'; कन्नड अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांना सज्जड दम, नोटीस देऊन कारवाईचे आदेश

संतापजनक! 'जातिवाचक शिवीगाळ करु बार्शीत दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग'; कोणी नसताना घरात घुसले अन्..

SCROLL FOR NEXT