पुणे

समलैंगिक संबधांना विरोध केल्याने पुण्यात तरुणावर कोयत्याने वार

वृत्तसंस्था

पुणे- पुण्यातील टिळक रस्त्यावर हॉटेल गिरिजाजवळ एका तरुणावर अनोळखी व्यक्तीने कोयत्यानेने वार केल्याची घटना आज (ता.21) दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या हल्यात जखमी झालेल्या तरुणास ससुन रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

समलैंगिक संबंधास विरोध केल्याच्या कारणावरुन तिघांनी या तरुणावर कोयत्याने वार केले आहेत. नागरीकांनी तिन्ही आरोपीस पकडुन पोलिसांकडे दिले. त्यापैकी एकजण अल्पवयीन आहे. दिनेश उर्फ गन्या सुरेश कांबळे (वय 24) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, मयूर मोतीराम राठोड (वय 18, रा.कामराज नगर येरवडा), महेश धनेश तिवारी (वय 18, रा. येरवडा) असे हल्ला केलेल्या आरोपी तरुणांची नावे आहेत. या दोघांसह आणखी एका अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी, खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस पुढील कारवाई करत आहेत. हल्ला झालेल्या तरुणाची मात्र अद्याप ओळख पटलेली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT