Attempt to burn his wife who refused to go to his elder brother house for work
Attempt to burn his wife who refused to go to his elder brother house for work 
पुणे

धक्कादायक! बायकोला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; मोठ्या भावाच्या घरी जायला नाही म्हटल्याचा राग

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर (पुणे)- मोठ्या भावाच्या घऱी कामानिमित्त जाण्यास नकार देणाऱ्या पत्नीच्या अंगावर डिझेल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न पतीनेच केल्याचा धक्कायदायक प्रकार उघडकीस आला आहे. कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे ही घटना घडली. महिलेने समयसुचकता दाखवत, तात्काळ डोक्यावरुन पाणी ओतल्याने साडीला लागलेली आग विझल्याने तीचा जीव वाचु शकला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यशोदा भागवत चौधरी (वय २५, रा. पेठकरवस्ती, कुंजीरवाडी, ता. हवेली) हे त्या महिलेचे नाव असुन, या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी यशोदा यांचा नवरा, भागवत सायप्पा चौधरी व दिर साईनाथ चौधरी (रा. निगडी, पुणे) या दोघांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 


लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यशोदा व भागवत यांचे आठ वर्षापुर्वी लग्न झाले असुन, दोघेही कुंजीरवाडी हद्दीतील पेटकर वस्तीवर राहतात. आहे. मागील दोन वर्षापासुन भागवत चौधरी हा दारु पिऊन चारित्र्याच्या संशयावरुन यशोदा हिला शिवीगाळ व मारहाण करीत आहे. दोघात भांडणे झाली की, भागवत हा यशोदाने माहेरहून २ लाख रुपये आणावेत या कारणासाठी छळ करत होता. मात्र ही कौटूंबिक बाब असल्याने यशोदा यांनी ही बाबतची तक्रार केली नव्हती. मात्र, भागवत देत असलेल्या तक्रारीबद्दल यशोदाने आपल्या आईवडीलांना वेळोवेळी माहिती दिली होती.

देवीच्या मंदिरात महिला पुजारीची मागणी; तृप्ती देसाईंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन 
दरम्यान दोन दिवसापुर्वी (सोमवारी) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास यशोदा, भागवत त्यांच्यामध्ये वादावादी झाली. यावेळी दोन्ही मुली घरी होत्या. भागवत याने भागवत याचा मोठा भाऊ साईनाथ यांच्या घरी जाण्याचा तगादा यशोदाकडे लावला. मात्र यशोदाने साईनाथ याच्या निगडी येथील घरी जाण्यास नकार दर्शवला. यशोदाने नकार देताच, भागवत याने घरातील स्टोव्हमधील डिझेल तिच्या अंगावर ओतले व आगपेटीमधील पेटलेली काडी गाऊनला लावली.डिझेलने गाऊन आणि केस ओले झाल्याने पेट घेतला. अशा अवस्थेत यशोदा घऱाबाहेर ओरडत आली. समयसुचकता दाखवत दारातील बादलीतील पाणी डोक्यावरुन अंगावर घेतले. पाणी मोठ्या प्रमाणात ओतून घेतल्याने, आगीचा भडका उडण्यापुर्वीच आग विझली. मात्र यात यशोदाचा डावा खांदा, डोक्याची डावी बाजु व चेहऱ्याची डावी बाजु जळाली आहे.

आग शमविल्यानंतर पती भागवत हा तेथुन निघुन गेला. ''आता थोडक्यात भाजलीस पुढच्यावेळी वाचणार नाही, अशी धमकी दिली. दरम्यान दीर साईनाथ यानेही यापुर्वी यशोदाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे यशोदाने पती भागवत व दिर साईनाथ या दोघांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

प्लेऑफची शर्यत झाली रोमांचक! CSK च्या विजयाने Points Tableचे बदलले गणित; मुंबईवर टांगती तलवार

Addiction in Teens : व्यसनांचा पाश अन् प्रकृतीचा विनाश.. पालकांनो, मुलांकडे लक्ष आहे का?

Parineeti Chopra : पहिल्याच भेटीत परिणीती चोप्रा पडली होती राघवच्या प्रेमात

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

SCROLL FOR NEXT