पुणे- ऑडिओबुक्स आणि श्राव्य माध्यमामध्ये आपला वेगळा ठसा उमटवणारे स्नॉवेल आता, "ती परत येईल ?" ह्या मूळ रोमांचक गूढकथेसह एका नाविन्यपूर्ण पद्धतीने आपल्या समोर येत आहेत! एका वेगळ्याच प्रकारचा श्राव्य अनुभव देण्यासाठी, पीव्हीआर पुणे येथे, स्नॉवेलने, भारतात प्रथमच, याप्रकारच्या 'ऑडिओ शो'च्या प्रीमियरचे आयोजन करण्यात आले होते. पुणे येथील सेनापती बापट मार्गावरील पीव्हीआर आयकॉन येथे हा ऑडिओ-शो-प्रीमियर आयोजित करण्यात आला होता.
डॉ. गिरीश ओक यांचा प्रमुख आवाज असलेल्या या कथेचे लेखक आहेत शिरीष देखणे आणि अंजली कुलकर्णी यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. श्राव्य माध्यमासाठी ही कथा खास करून लिहिण्यात आली आहे. दुसर्या महायुद्धाची पाश्वभूमी असलेल्या या कथेचे कथानक सुयोग्य श्राव्य अनुभवासाठी अनेक अनपेक्षित वळणे घेत श्रोत्यांना खुर्चीला खिळवून ठेवते.
रारंग ढांग, प्रेषित, वनवास, समुद्र, सत्यजित राय यांच्या कथा, कुमाऊँचे नरभक्षक, खेकडा, सारे प्रवासी घडीचे, दि. बा. मोकाशी यांच्या कथा यासारखे अनेक दर्जेदार श्राव्यानुभव यासाठी स्नॉवेल विख्यात आहे. ‘‘ती परत येईल?’’ ही नवीन कलाकृती श्रोत्यांचे कान आणि मन तृप्त करेल यात शंकाच नाही! हा श्राव्यानुभव स्नॉवेलचे संकेतस्थळ (https://snovel.in) येथे आणि मोबाईल अॅपवरदेखील उपलब्ध होणार आहे.
या ऑडिओ-शोसाठी निर्माते नितीन वैद्य, अभिनेत्री चिन्मयी सुमीत, लेखिका मनस्विनी लता रवींद्र, दिग्दर्शक वरुण नार्वेकर, गायक-लेखक डॉ. आशुतोष जावडेकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.