Bala-Bhegade
Bala-Bhegade 
पुणे

गुणवैशिष्ट्यांमुळेच भेगडे यांना संधी

सकाळ वृत्तसेवा

वडगाव मावळ - तोंडात साखर, डोक्‍यावर बर्फ असा विनम्र स्वभाव, उत्तम संघटन कौशल्य व सर्व वयोगटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मिसळण्याची हातोटी या गुणांमुळे तालुका युवा मोर्चा अध्यक्षपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरवात करणारे मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी अखेर मंत्रिपदाला गवसणी घालण्यात यश मिळवले आहे. 

आमदार भेगडे मावळ विधानसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा विजयी झाले. त्यांच्या कार्यकाळात तालुक्‍यातील महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांवरही भाजपने वर्चस्व मिळवले व एकेकाळी काँग्रेसचा समजला जाणारा बालेकिल्ला या पक्षाने काबीज केला. पक्ष संघटनेतही त्यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. भेगडे यांच्या घराण्याचे तालुक्‍यात भाजप संघटना वाढविण्यात महत्त्वाचे योगदान राहिले आहे. त्यांचे वडील विश्‍वनाथराव भेगडे हे पक्षाचे निष्ठावंत नेते म्हणून परिचित होते. त्यांचे संघटन कौशल्य व कार्यकर्त्यांना बळ देण्याचे धोरण पक्षवाढीसाठी पोषक ठरले. तालुक्‍यात काँग्रेसमय वातावरण असताना त्यांनी विधानसभेच्या तीन निवडणुका लढविल्या. परंतु, त्यात त्यांना यश आले नाही. आमदार भेगडे यांनी वडिलांचा वसा पुढे चालू ठेवला व सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या कामाला सुरवात केली. सन २००४ मध्ये तालुका भाजयुमोच्या अध्यक्षपदापासून खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकीय वाटचालीला सुरवात झाली.

पाच वर्षांत त्यांनी गावोगावी युवकांचे संघटन करून युवा मोर्चाच्या संघटना स्थापन केल्या. त्याचीच पावती म्हणून पक्षाने त्यांना कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढविण्याचा अनुभव नसताना सन २००९ मध्ये थेट विधानसभेची उमेदवारी दिली. त्यानंतर सलग दोन वेळा त्यांनी विधानसभेची निवडणूक जिंकली. पक्ष संघटनेतही पक्षाने त्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या. प्रदेश भाजयुमोचे उपाध्यक्षपद व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष असताना भेगडे यांनी त्यांच्यासमवेत प्रदेश सरचिटणीसपदाची जबाबदारी सांभाळली. विधिमंडळात पक्षप्रतोदपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. गेल्या तीन वर्षांपासून ते पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. या काळात त्यांनी जिल्ह्यात नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची संख्या वाढविण्यात यश मिळवले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी जिल्ह्यात प्रचाराची धुरा सांभाळली.

मावळ लोकसभा मतदारसंघात युतीच्या विजयात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. मंत्रिपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव अनेकदा चर्चेत आले. परंतु, मंत्रिपद त्यांच्यापासून दूरच राहिले होते. नाउमेद न होता ते काम करीत राहिले व अखेर त्यांनी मंत्रिपदाला गवसणी घातली व वडिलांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण केले. 

त्यांच्या मंत्रिपदामुळे तालुक्‍यात भाजपचा गडही मजबूत झाल्याचे मानले जाते. एकेकाळी काँग्रेसच्या समजल्या जाणाऱ्या बालेकिल्ल्यात गेल्या पंचवीस वर्षांपासून भाजपचा आमदार आहे. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थाही पक्षाने काबीज केल्या आहेत व आता मंत्रिपदामुळे मावळ तालुका हा खऱ्या अर्थाने भाजपचा बालेकिल्ला झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT