लोगो - अर्थमंत्र
- सुधाकर कुलकर्णी
बँकेकडून मिळणाऱ्या सेवा-सुविधा
मित्र-मैत्रिणींनो आजवरच्या लेखांतून आपण बचत व चालू खाते, विविध पेमेंट सुविधा, केवायसी यांसारख्या बाबींची माहिती घेतली आज आपण बँकेकडून ग्राहकाला कोणत्या सेवा व सुविधा दिल्या जातात याची एकत्रित माहिती घेऊया. बँकेकडून ग्राहकाला देण्यात येणाऱ्या सेवा व सुविधांचे प्राथमिक सेवा व दुय्यम सेवा असे वर्गीकरण करता येते. बँकाचे कार्य केवळ ठेवी स्वीकारणे व कर्ज देणे एवढ्यापुरतेच मर्यादित नसून ग्राहकाच्या विविध आर्थिक गरजा पुरविल्या जातील अशा पद्धतीने काम करणे होय.
प्राथमिक सेवा
१) ग्राहकांच्या ठेवी स्वीकारणे
ग्राहकांच्या ठेवी स्वीकारणे ही एक महत्त्वाची सुविधा आहे. यामुळे आपल्याकडील शिल्लक रक्कम सुरक्षित तर राहतेच शिवाय अशा रकमेवर व्याजही मिळते. त्यामुळे आपली शिल्लक वाढत जाते.
- बचत खाते (सेव्हिंग्ज अकाऊंट) : सामान्य नागरिकांना बचतीची सवय लावण्यासाठी हे खाते असते. त्यावर ठरावीक व्याज मिळते. सध्या हे व्याज वार्षिक सुमारे ३ ते ३.५% टक्के आहे. थोडक्यात, हे खाते वैयक्तिक स्वरूपाचे असते.
- चालू खाते (करंट अकाऊंट) : हे प्रामुख्याने व्यापारी आणि उद्योजकांसाठी असते. यामध्ये व्यवहारांच्या संख्येवर मर्यादा नसते, मात्र या खात्यावर व्याज मिळत नाही. हे खाते व्यावसायिक स्वरूपाचे असते.
- मुदत ठेव (फिक्स्ड डिपॉझिट) : या खात्यात ठरावीक कालावधीसाठी एकरकमी रक्कम जमा केली जाते. हा कालावधी किमान ७ दिवस, तर कमाल १० वर्षे इतका असतो. एक वर्षापेक्षा कमी कालावधी असल्यास त्याला ‘अल्प मुदत ठेव’ असे म्हणतात व त्याहून जास्त कालावधी असल्यास त्याला ‘मुदत ठेव’ असे म्हणतात. या खात्यावर कालावधीनुसार व्याज मिळते व हे व्याज बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त असते.
- आवर्ती ठेव (रिकरिंग डिपॉझिट) : दरमहा ठरावीक रक्कम जमा करण्याची ही सोय असते. या मुळे आपल्याला भविष्यातील गरजांची तरतूद करणे शक्य होते.
२)कर्ज
कर्ज देऊन ग्राहकांना आवश्यक ते आर्थिक पाठबळ देणे ही दुसरी अत्यंत महत्त्वाची सुविधा बँका ग्राहकांना देतात. यामुळे आपल्याला वेळीच आपल्या प्राथमिक गरजा भागविणे शक्य होते.
- वैयक्तिक कर्ज (पर्सनल लोन) : असे कर्ज घेऊन आपली घरगुती किंवा वैयक्तिक अडचण दूर करता येते.
- गृह कर्ज (होम लोन) : घर बांधता येते किंवा विकत घेता येते.
- वाहन कर्ज (व्हेइकल लोन ) : यामुळे आपल्याला दुचाकी/चारचाकी गाडी विकत घेता येते.
- शैक्षणिक कर्ज (एज्युकेशन लोन) : पालक आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणाचा खर्च करू शकतात.
- व्यावसायिक कर्ज (बिझनेस लोन ) : आपल्याला व्यवसाय सुरू करता येतो व तो पुढे वाढवताही येतो.
३) डिजिटल सेवा
- नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग : नेट किंवा मोबाईल बँकिंगमुळे बहुतांश व्हावहार आता घरबसल्या कोणत्याही वेळी करता येतात. अगदी सुट्टीच्या दिवशीसुद्धा हे व्यवहार करता येतात. यामध्ये फंड ट्रान्स्फर (यूपीआय, एनईएफटी/आरटीजीएस/आयएमपीएसचा वापर करून), खाते उतारा (स्टेटमेंट), नवीन एफडी करणे, कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करणे इ. प्रामुख्याने समविष्ट आहेत. तसेच, पेमेंट सुलभ करता यावे व तेही कॅशलेस यासाठी बँका डेबिट कम एटीएम कार्ड व क्रेडिट कार्डही ग्राहकाला देतात.
दुय्यम सेवा
- लॉकरसुविधा : ही सुविधा वापरून आपण मौल्यवान दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवू शकतो. यासाठी वार्षिक भाडे द्यावे लागते. हे भाडे लॉकरच्या आकारानुसार कमी-अधिक असते.
- इन्शुरन्स आणि गुंतवणूक : बँका आता विविध इन्शुरन्स कंपन्याच्या सहयोगाने आरोग्य विमा तसेच आयुर्विमा पॉलिसी देतात. याच बरोबर एनपीएस, पीपीएफ, म्युचुअल फंड, पेन्शन फंड यांसारखे अन्य गुंतवणुकीचे पर्याय ग्राहकाला देऊ करत आहेत.
- विदेश विनिमय सेवा (फॉरेन एक्स्चेंज सर्व्हिस) सुद्धा बँक देतात. याचबरोबर शेअर बाजारात व्यवहार करता यावेत यासाठी डी-मॅट, तसेच ब्रोकर सर्व्हिसही देताता.
ज्येष्ठ नागरिक
जेष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तीसाठी विशेष सेवा बँका देतात. यामध्ये घरी जाऊन भरणा स्वीकारणे व तो सबंधित ग्राहकाच्या खात्यात जमा करणे अशा सुविधांचा समावेश यात आहे. ज्येष्ठ नागरिकांना व्याजदरही थोडा जास्त मिळतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.