Baramati administration ready for polling process says Hemant Nikam
Baramati administration ready for polling process says Hemant Nikam 
पुणे

Loksabha 2019 : मतदान प्रक्रियेसाठी बारामती प्रशासन सज्ज : हेमंत निकम

मिलिंद संगई

लोकसभा 2019
बारामती शहर : येत्या 23 तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी शांततेत मतदान पार पडावे यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांनी आज दिली.

बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 371 मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. 3 लाख 39 हजार 218 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. मतदानादरम्यान कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी सुरक्षेची तगडी व्यवस्था करण्यात आली आहे. 1855 कर्मचारी निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेत काम करणार असून यात सातशे पोलीस कर्मचारी, पोलीस निरीक्षक दर्जाचे 20 अधिकारी, तीन उपविभागीय पोलिस अधिकारी निवडणुकीच्या कामात मदत करणार आहेत.

याशिवाय राज्य राखीव दलाची एक कंपनी, आरपीएफ आणि सीआरपीएफच्या प्रत्येकी एक कंपनी असे तीनशे अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी या निवडणुकीसाठी तैनात करण्यात आलेले आहेत. राज्य परिवहन मंडळाच्या 66 बसेस तसेच शंभर खासगी वाहने अधिग्रहित करण्यात आले आहेत. सेक्टर पेट्रोलिंग साठी 160 कर्मचारी कार्यरत असून संवेदनशील मतदान केंद्रावर 10 ठिकाणी 100 सीआरपीएफचे जवान कार्यरत राहतील असे निकम यांनी सांगितले. 

दरम्यान या निवडणुकीमध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात 38 मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग केले जाणार आहे. देशभरामध्ये कोणीही या 38 मतदान केंद्रावर सुरू असणारी मतदानाची प्रक्रिया थेट पाहू शकणार आहेत. दरम्यान मतदान केंद्रांमध्ये मोबाईल नेण्यास मनाई करण्यात आली असून मतदान केंद्राच्या आवारात मोबाईल सापडल्यास तो जप्त केला जाणार असून परत दिला जाणार नाही, असे हेमंत निकम यांनी सांगितले. 

दरम्यान मतदान केंद्रापासून शंभर मीटरच्या आत मध्ये मतदार आणि उमेदवार या दोघांव्यतिरिक्त इतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही, मतदान झाल्यानंतर मतदारांनी या शंभर मीटरच्या बाहेर तात्काळ जावे असे आवाहन त्यांनी केले आहे. अपंग मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर व्हीलचेअरची सोय करण्यात आली असून सर्व ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दरम्यान सुरक्षा व्यवस्थेमध्ये बाधा येऊ नये या उद्देशाने बारामती व इंदापूर या दोन तालुक्यातील 350 जणांवर मतदानाचा हक्क अबाधित ठेवून तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी मतदारांच्या रांगा लागतात व सावली नाही अशा ठिकाणी मंडपाची व्यवस्था यावेळेस पहिल्यांदाच करण्यात आली आहे. 

सकाळी सहा वाजता प्रत्येक मतदान केंद्रावर मॉक पोलिंग एजंटच्या समक्ष होणार आहे. दरम्यान प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली व्होटर स्लिप मतदानासाठी ओळखपत्र म्हणून वापरता येणार नाही, निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निर्देशानुसार पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पासबुक, पॅन कार्ड, आधार कार्ड यासारखे ओळखपत्र वापरावे लागणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Election : शहिदांचा अन् जवानांचा अपमान सोलापूरकर करणार का? फडणवीसांची प्रणिती शिंदेवर जोरदार टीका

Nude Image Generator : अ‍ॅपलने अ‍ॅप स्टोअरवरुन काढून टाकले न्यूड इमेज बनवणारे Apps; इन्स्टावर जाहिराती दिसल्यानंतर कारवाई

Shrikant Shinde: 'पंजा'ला मतदानावरून ठाकरे X शिंदे, 'शिल्लक सेना' उल्लेख करत डागली तोफ

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: 'नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडवू'; धमकीचा मेल आल्याने खळबळ

SCROLL FOR NEXT