पुणे

बारामतीचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण

मिलिंद संगई

बारामती शहर - शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प येत्या आठवड्यात कार्यान्वित होणार आहे. कऱ्हा नदीमध्ये सोडले जाणारे सांडपाणी या प्रकल्पात साठवून त्यावर प्रक्रिया करून परत हे पाणी नदीमध्ये सोडले जाणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावरील प्रदूषण दूर होऊन शेतकऱ्यांनाही भविष्यात शेतीसाठी या पाण्याचा वापर करता येणार आहे. बारामती नगरपालिकेने २०१४ पासून हाती घेतलेला तब्बल २५ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प अखेर चार वर्षांच्या कालावधीनंतर पूर्णत्वास येत आहे. 

अत्याधुनिक प्रकल्प
बारामतीचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अत्याधुनिक असून, एसबीआर (सिक्वेन्शल बॅच रिॲक्‍टर) तंत्रज्ञानावर आधारित व संपूर्ण स्वयंचलित आहे. प्रशासकीय इमारत, प्रयोगशाळा यांचाही या प्रकल्पात समावेश आहे. सांडपाण्यावरील प्रक्रिया व्यवस्थित व्हावी, असा या मागील उद्देश आहे.
 
प्रदूषण अजिबात नाही
नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषानुसार जैविक ऑक्‍सिजन मागणी किमान दहा मिलिग्रॅम प्रतिलिटर इतकी असावी लागते. बारामतीच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून बाहेर पडणारे पाणी पाच मिलिग्रॅम प्रतिलिटर असल्याने प्रदूषणाचा धोका शून्यावर आला आहे. पुढील तीस वर्षांत बारामतीची मूळ गावठाणातील लोकसंख्या किती असेल, अशा गृहीतकावर या प्रकल्पाच्या क्षमतेचे निश्‍चितीकरण करण्यात आले आहे. 

शेतीसाठी वापरणार पाणी
या प्रकल्पातून प्रक्रिया केल्यानंतर सात ते आठ दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी बाहेर पडेल. कालांतराने हेच पाणी साडेअकरा दशलक्ष लिटरपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. हे पाणी भविष्यात शेतीसाठी देण्याचा नगरपालिकेचा प्रयत्न असेल. या बाबत अद्याप धोरणनिश्‍चिती करण्यात आली नाही. मात्र हे पाणी नाममात्र दराने विक्री करून त्यापासून नगरपालिका उत्पन्नही मिळवू शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT