Supriya Sule
Supriya Sule Sakal
पुणे

Supriya Sule : महिलांनी संघर्षात खचायचं नसते, तर धैर्याने लढायचे असते

कल्याण पाचांगणे

माळेगाव - महिलांच्या कर्तुत्वाचा सन्मान करणारा आणि महिलांच्या हक्कांना प्रोत्साहन देणारा शारदानगर (ता.बारामती) येथील महिला मेळावा आज सर्वार्थाने वैशिष्ठ्यपूर्ण ठरला. महिलांना कामावर, घरात आणि समाजात अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते, अशा महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी सुनंदा पवार यांच्या मेळाव्याचा चांगला उपयोग होईल, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

`संघर्ष हा आयुष्यात न सांगता वादळासारखा येत असतो. त्यामुळे खचून न जाता महिलांनी माझ्या सारखी धैर्याने त्यावर मात केली पाहिजे,` असा सल्ला सुळे यांनी उपस्थित सुमारे दोन हजार महिलांना दिला. याचवेळी उपस्थितांमधून ताई आम्ही तुमच्या खंबीरपणे पाठीशी आहोत, असा आवाज येताच सभागृहात एकच टाळ्यांचा कडकडाट झाला.

अॅग्रीकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट बारामती संचलित शारदा महिला संघाच्यावतीने महिला दिनाचे औचित्य साधत आज महिला मेळावा घेतला होता. यासाठी विश्वस्त सुनंदा पवार यांचा पुढाकार महत्वाचा ठरला. यावेळी विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या १८ महिलांचा सन्मान झाला.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. सुनंदा पवार, कुंती पवार, सविता व्होरा आदी पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होत्या. दरम्यान, शारदा महिला संघाच्या वतीने गेली १८ वर्ष जागतिक महिला दिन साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून यावर्षीही संघाच्यावतीने राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा,आरोग्य, शेतीविषयक अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.

त्या सत्कारमुर्तीमध्ये संसदपट्टू सुप्रिया सुळे यांचाही समावेश होता. तसेच प्रभा जनार्दन भोसले (सातारा), रेखा रविंद्र बागुल (जुन्नर), विमल सिद्राम माळी (अहमदनगर), सुहासिनी ओमप्रकाश कोयटे (कोपरगाव), स्वाती बाळासाहेब पाटील (माढा सोलापूर),अर्चना प्रकाश सातव( हनुमाननगर-बारामती), भावना चंद्रभान जनबंधू (नागपूर), वर्षा महावीर अंधारे (सोलापूर), सौ.वैशाली गणेश जगदाळे (भरतगाव दौंड), शहनाज एजाज शेख (बारामती), सुप्रिया शरद किंद्रे (बालवाडी भोर), श्वेता सुरेशराव ठाकरे (यवतमाळ), श्रीमती मनीषा गणेश जगताप (बारामती), शाहीनबेगम मंजूर शेख-(उरुळी-कांचन), काव्या राजेश दातखीळे (जुन्नर), कोमल राजेंद्र जगताप (पाहुणेवाडी),अश्विनी राजेंद्र जगताप (डाळज) यांचाही सन्मान झाला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या सातपुते व वर्षा पटणे यांनी केले. आभार गार्गी दत्ता यांनी मानले.

लक्षवेधी सत्कारमूर्तीची मनोगते..

सत्कारमूर्ती अश्विनी जगताप यांनी जीवनातील संघर्षांना तोंड देत पोलीस प्रशिक्षण घेतले आणि पोलीस झाल्याचे सांगितले. अर्चना सातव म्हणाल्या,' अर्थिकदृष्या स्त्री काहीशी सक्षम झाली की तिचा विविध क्षेत्रात पुढे येणाचा आत्मविश्वास वाढतो. नेमके तेच ओळखून सुनंदा पवार यांनी राबविलेली भिमथडी जत्रेसारखी बाजारपेठ महिलांना फायद्याची ठरत आहे.

'सुप्रिया किंद्रे यांनी जगामध्ये सौंदर्य महत्त्वाचे नसून कर्तृत्व महत्त्वाचे असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुषही आहे. त्याचा पाठिंबा मिळाला तर स्त्रिया आणखी पुढे जाऊ शकते. महिलांच्या कार्याला कौतुकाची थाप मिळाली पाहिजे तरच महिलांमधील अंतर्भूत क्षमता बाहेर येईल, असे किंद्रे यांनी सांगितले. कोमल जगताप, विमल माळी, भावना जनबंधू, प्रभा भोसले, श्वेता ठाकरे आदींची लक्षवेधी मनोगते झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मतदानात महाराष्ट्र तळाला, आतापर्यंत झालेल्या मतदानात 'हा' मतदारसंघ आघाडीवर

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT