baramatis Builder dada salunke murder At ujni Dam
baramatis Builder dada salunke murder At ujni Dam 
पुणे

बारामतीत बांधकाम व्यावसायिकाचा खून

सकाळवृत्तसेवा

बारामती : बारामतीतील बांधकाम व्यावसायिक दादा साळुंके यांचा खून झाल्याची घटना काल (ता. 12) सकाळी 10 च्या सुमारास घडली आहे. ही घटना उजनी धरणाच्या खालील बाजूस सोलापूर-पुणे महामार्गावरील पुलाखाली घडली आहे.

या ठिकाणी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मिळाला होता. सदर व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला आहे. घटनास्थळावर मोटारीचे चाकाच्या खुणा दिसून येत असल्याने सदर व्यक्तीचा इतरत्र कोठेतरी खून करून त्याचा मृतदेह पुलाखाली आणून टाकला असण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मयताच्या अंगावरील कपड्यावर 'Sikwera टेलर्स बारामती' असा टेलरमार्क आहे. यावरून मयत हा बारामती परिसरातील असण्याचा अंदाज लावण्यात आला.

मयताच्या अंगावर पांढरा शर्ट व निळी जीन्स पॅन्ट असून वर्ण गोरा होता. वय अंदाजे 30 ते 35 वर्ष आहे. याबाबत टेंभुर्णी पोलिस स्थानकांमध्ये अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढिल तपास पोलिस करत आहेत.

दरम्यान, दादा साळुंके हे राष्ट्रवादी जनरल कामगार युनियनने माजी अध्यक्ष होते. तसेच त्यांच्या आई या बारामती एमआयडीसी लगत असलेल्या वंजारवाडी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच होत्या. दादा साळुंके हे विविध कामगार संघटना, सामाजिक उपक्रम, व युवकांमध्ये नेहमी सक्रीय सहभागी सहभागी होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT