जंगली महाराज रस्ता - गरवारे कॉमर्स महाविद्यालयाचे १९७७ च्या बॅचचे विद्यार्थी.
जंगली महाराज रस्ता - गरवारे कॉमर्स महाविद्यालयाचे १९७७ च्या बॅचचे विद्यार्थी. 
पुणे

साठीतल्या तरुणांचा आठवणींना उजाळा

सकाळ वृत्तसेवा

पुणे - वयाची साठी गाठलेल्या तरुणांनी आपल्या महाविद्यालयीन आठवणींना स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा उजाळा दिला. १९७७ मध्ये गरवारे कॉमर्समधून बी. कॉम.ची पदवी घेतलेल्या सुमारे ५० हून अधिक मित्र-मैत्रिणींचे एक दिवसाचे स्नेहसंमेलन नुकतेच झाले. जंगली महाराज रस्त्याजवळील ‘क्‍लार्क्‍स इन्‌’ हॉटेलमध्ये हा कार्यक्रम झाला.

कार्यक्रमासाठी मुंबई, ठाणे, सावंतवाडी, पाचगणी येथून मित्र मैत्रिणी एकत्र आले होते. काही जण सुमारे चाळीस वर्षांनंतर प्रथमच एकमेकांना भेटत होते. हिंदी गीतांच्या कार्यक्रमातून सूत्रसंचालन करणारे प्रसन्नकुमार भिडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. त्यांनी सादर केलेल्या ‘अमिताभ’च्या संवादांमुळे, सर्वांच्या डोळ्यापुढे दीवार चित्रपट उभा राहिला. सुनीता देव यांनी पु. लं.च्या पुस्तकातील नाट्यछटेचा काही भाग सादर केला. 

कुंदा पानसे यांचे शास्त्रीय गीतगायन, तर श्रीरंग रानडे, रमेश महाजन, सुनीता देव यांची हिंदी मराठी गीते यामुळे सर्वांनाच जुन्या काळात नेले. उत्कृष्ट पोषाखाबद्दलची खास बक्षिसे नंदकिशोर पोरे व मुग्धा जोशी यांनी पटकावली. कार्यक्रमाचे नियोजन प्रसन्न भिडे, अजित धर्मे, कुमार पारखी, मुकुंद खुस्तले, सुनीता देव आणि उषा सोमण यांनी केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

DC vs MI, IPL : दिल्लीकडून आजपर्यंत कोणालाच जमला नव्हता, तो विक्रम फ्रेझर-मॅकगर्कने एकदा नाही तर दोनदा करून दाखवला

Fact Check : चीनमधला पूल मुंबईचा सांगून '४०० पार' चा दावा; फोटो व्हायरल

Latest Marathi News Live Update: भाजप -एनडीए 2-0 ने आघाडीवर; कोल्हापुरात पीएम मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

Ujjwal Nikam: "माझा जन्म हनुमान जयंतीचा", 'मविआ' उमेदवाराला कसं रोखणार या प्रश्नावर निकमांचा थेट युक्तिवाद

SCROLL FOR NEXT