Pankaja Munde
Pankaja Munde sakal
पुणे

Pankaja Munde : कामाच्या जोरावर बीड मधून विजयी होणार

सकाळ वृत्तसेवा

कोथरूड - बीड लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाचा उमेदवार कोण आहे याचा माझ्या विजयावर कोणताही परिणाम होणार नाही. मी जिल्ह्याची पालकमंत्री असताना केलेल्या कामाच्या जोरावर जनतेच्या मनात स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे मोठ्या मताधिक्याने मी विजयी होईल, असा विश्‍वास भाजप नेत्या, बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.

पुणे लोकसभेचे उमेदवार माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या जनसंपर्क कार्यालयास आज (ता. २१) पंकजा मुंडे यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार माधुरी मिसाळ यावेळी उपस्थित होत्या.

मुंडे म्हणाल्या, गोपीनाथ मुंडे यांच्या जवळचे, माझे युवा मोर्चातील सहकारी मुरलीधर मोहोळ यांना शुभेच्छा देण्यासाठी आज कार्यालयात आलेली आहे.

गेल्या पाच वर्षात जे काही घडले त्यातील चांगल्या गोष्टीचा फायदा कोणताही पक्ष घेत असतो. तसेच इतर गोष्टींचा होणाऱ्या परिणामांचा विचार करूनच निवडणुकीची आखणी होत असते. बीड मतदारसंघ पुढारलेल्या विचारांचा आहे. या जिल्ह्याने आत्तापर्यंत वेगवेगळ्या समाजाचे खासदार निवडून दिलेले आहेत. येथील मतदार विकासाच्या दृष्टीने मतदान करतात.

मी पालकमंत्री म्हणून काम करताना सर्वसमावेश धोरण राहिलेले आहे. प्रत्येक गावाशी, जाती धर्माशी जवळचा संबंध आलेला आहे. त्यामुळे माझ्या विषयी कोणाच्याही मनात कुठलीही कटुता नाही. माझ्या कामाच्या बळावर मी चांगल्या मताधिक्याने विजयी होईल.

महादेव जानकर यांची समजूत काढणार का? असे विचारले असता मुंडे म्हणाल्या, मी सध्या लोकसभेच्या उमेदवारीकडे पूर्णतः लक्ष दिले आहे. पण पक्षाने मला काही जबाबदारी दिली तर ती निभावेन. राज्याच्या जबाबदाऱ्या राज्याच्या नेत्यांच्या खांद्यावर आहेत. ते त्याला व्यवस्थितपणे हताळतील अशी माझी अपेक्षा आहे. भाजपची ताकद जास्तीत जास्त वाढावी यासाठी सगळेजण योगदान देतील.मागच्या तीनही निवडणुकीत मी राज्यभर व राज्याबाहेरही प्रचार केलेला आहे. त्यामुळे पक्ष सांगेल त्या नुसार मी काम करेन.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: आशिष शेलारांनी बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले महायुती मुंबईतील सर्व सहा जागा जिंकेल...

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT