Bharti vidyapeeth satyajyot pratisthan dahihandi utsav
Bharti vidyapeeth satyajyot pratisthan dahihandi utsav 
पुणे

सत्यज्योत प्रतिष्ठान भारती विद्यापीठची दहीहांडी उत्साहात साजरी

अशोक गव्हाणे

पुणे- भारती विद्यापीठ पुणे येथिल सत्यज्योत प्रतिष्ठानने आयोजित केलेला दहिहांडी उत्सव काल (ता.03) उत्साहात पार पडला. साऊंड सिस्टीमच्या तालावर ठेका धरणारी तरुणाई... थरावर थर रचण्याचा प्रयत्न करणारे गोविंदा... अशा उत्साही वातावरणात सोमवारी हा दहीहंडी उत्सव पार पडला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी गाण्यांच्या ठेक्यावर खूप जल्लोष केल्याचे पहायला मिळाले.



सत्यज्योत प्रतिष्ठानची ही दहीहंडी मुंबई, चेंबूर येथिल मराठा योद्धा गोविंदा पथकाने पाचव्या थरावर तिसऱ्या प्रयत्नात फोडली. तसेच, या उत्सवासाठी रुद्ररुपम ढोल ताशा पथकाचा गजरही तरुणाईला अनुभवायला मिळाला. 

यावेळी, सत्यज्योत प्रतिष्ठानचे संस्थापक गणेश काळे, अध्यक्ष अतुल काकडे, उपाध्यक्ष बाळासाहेब गदळे, कार्याध्यक्ष महेश दसवडकर, प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी, सत्यज्योत प्रतिष्ठानकडून उपस्थितांचे आभार मानण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT