Nandi Bail
Nandi Bail  Pune
पुणे

भोलानाथ चालला समाजापासून दूर

सकाळ वृत्तसेवा

नंदीबैलाची परंपरा लोप पावण्याच्या दिशेने, सांग सांग भोलानाथ.... पाऊस पडेल का..... असं भाकीत करणारा नंदी बैल नजरेस पडला की डोळ्यापुढे लहानपणीचे दिवस उभे राहिल्यावाचून राहत नाही.

खडकी - सांग सांग भोलानाथ.... पाऊस पडेल का..... असं भाकीत करणारा नंदी बैल नजरेस पडला की डोळ्यापुढे लहानपणीचे दिवस उभे राहिल्यावाचून राहत नाही. खरे भविष्य सांगणारा नंदीबैलाकडे कोणी आयुष्याच्या अडचणी घेऊन आशेने त्याच्याकडे जातो तर कोणी परीक्षेत पास होणार का म्हणून नंदी बैलासमोर नतमस्तक होतो. मान हलवून नंदी मात्र सगळ्यांच्या मनोकामना काहीकाळ का होईना पूर्ण करतो. नंदिवाले ढोल वाजवत नंदीला नाचवात नंदीच्या आशीर्वादाने इडा पिडा दूर होईल माई..... तुमचा संसार सुखाचा होईल....तुमचं भविष्य सांगतो....थोडा खर्च होईल माई.... असं म्हणत पोटापाण्यासाठी गावो गावी फिरतात. मात्र हल्ली हा नंदीबैल व त्याची परंपरा नाहीशी होत चाललेली आहे. आमची पुढची पिढी ही परंपरा पुढे नेतील की नाही याची शाश्वती नाही. अशी खंत नंदिवाले संतोष विधाते यांनी बोलून दाखवली. मुळारस्ता भागात सोमवारी हे नंदिवाले एका नंदी बैला सोबत फिरत होते. अनेक लहान मोठी मुले कौतुकाने व कुतूहलाने त्याच्याकडे पहात होती.

भोलानाथ प्रत्यक्ष कसा दिसतो ते लहान मुलांनी पहिले व त्याने केलेल्या खेळाचा आनंद घेतला. दरम्यान बारामती हून आलेले नंदिवाले संतोष विधाते, पांडुरंग पवार, मधुकर वायकर सांगतात की शेतीची कामे उरकली की सहा महिने गावो गावी फिरून पोटापाण्यासाठी व परंपरा टिकवण्यासाठी हा व्यवसाय अजून सुरु ठेवला आहे. वडिलोपार्जित व्यवसायाचे लहानपणापासून शिक्षण घेतले. सांकेतिक भाषा शिकलो. अभ्यास करूनच आम्ही भविष्य सांगतो. नांदीसाठी दररोजचा खर्च भागवण्यासाठी आम्हाला फिरावेच लागते. पूर्वी गावो गावी फिरून आम्ही मिळेल त्यात समाधानी होतो. मात्र सध्या इंटरनेट, मोबाईल मुळे आमच्या व्यवसायावर गदा आली आहे. लोकांनी आमच्याकडे पाठ फिरवल्याने आमचा व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गांवर आहे. शासनाने आमची दाखल घेतली पाहिजे. अशी मागणी त्यांनी सकाळच्या माध्यमातून केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जेपी नड्डा, अमित मालवीय यांना 'आक्षेपार्ह पोस्ट' प्रकरणी पोलिसांचे समन्स, काय आहे प्रकरण?

T20 Cricket: 12 धावात खेळ खल्लास! तब्बल 6 फलंदाज भोपळाही फोडला नाही; टी20 सामन्यात झाला अनोखा विक्रम

Sam Pitroda: पित्रोदांच्या विधानावरुन PM मोदींचं तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान; म्हणाले, युती...

SRH vs LSG Live Score : तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, पाकिस्तानशी थेट कनेक्शनची शक्यता

SCROLL FOR NEXT