Malnutrition
Malnutrition 
पुणे

बालकांच्या कुपोषणमुक्तीचा ‘भोर पॅटर्न’

विजय जाधव

भोर - अंगणवाडीतील बालकांना कुपोषणमुक्त करण्यासाठी भोर तालुक्‍यातील एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्पांतर्गत राबविलेल्या ‘कुपोषणमुक्त बालक’ उपक्रमामुळे तालुक्‍यातील कुपोषण थांबले असून, बालके सुदृढ झाली आहेत. त्यामुळे कुपोषणमुक्तीचा ‘भोर पॅटर्न’ संपूर्ण जिल्ह्यात राबविण्याचा निर्धार जिल्हा परिषदेने केला आहे.

भोर तालुक्‍यातील बालकांच्या कुपोषणमुक्तीसाठी सन २०१८ मध्ये तत्कालीन गटविकास अधिकारी संतोष हराळे यांच्या संकल्पनेतून कुपोषणमुक्तीचा हा पॅटर्न सुरू करण्यात आला. महिला बालकल्याण व आरोग्य विभागाच्या मदतीने तालुक्‍यातील अंगणवाड्यांमधून तीव्र कुपोषित व मध्यम कुपोषित बालके शोधून काढली. 

त्यानंतर करण्यात आलेल्या उपायांमुळे कुपोषणाचे प्रमाण कमी होत गेले. जून २०१८ मध्ये तीव्र कुपोषित बालकांची संख्या १७ आणि मध्यम कुपोषितांची संख्या ५१ होती. त्यानंतर सन २०१९ मध्ये तीव्र कुपोषितांची संख्या फक्त २ राहिली होती. त्यानंतर २०१९ मध्ये पुन्हा सर्व्हे करून आढळलेल्या काही थोड्या मध्यम कुपोषित बालकांना पुन्हा आहार सुरू करण्यात आला. या उपक्रमातील काही क्षुल्लक दोष दुरुस्त करून कंपन्यांच्या ‘सीएसआर’ फंडातून मध्यम कुपोषित बालकांना आहार व औषधे विस्तृत स्वरूपात देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे संपूर्ण भोर तालुका कुपोषणमुक्त झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT