15.11 percent voting in Bhosari vidhan sabha 2019  Till 11 am
15.11 percent voting in Bhosari vidhan sabha 2019 Till 11 am 
पुणे

Vidhan Sabha 2019 : भोसरीत ११ वाजेपर्यंत १५.११ टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : भोसरीत पावसाने उघडीप दिल्याने मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. सकाळी ११ वाजेपर्यंत एकूण १५.११ टक्के मतदान झाले. मतदार संघात सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत ४२ हजार ४५६ पुरुष मतदार, २४ हजार २०३ महिला अशा एकूण ६६ हजार ६६० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 

लांडेवाडी येथील राजमाता जिजाऊ माध्यमिक विद्यालय, मनपा सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यालय, पीएमटी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय येथे मतदारांनी सकाळपासूनच रांगा लावून मतदान केले. 

प्रत्येक ठिकाणी मतदार सहायता कक्षाअंतर्गत केंद्र स्तरीय मतदार अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. तेथे मतदार याद्यांमधून मतदारांची नावे शोधून त्यांना मतदार चिठ्ठ्या देण्यात येत होत्या. शिवाजी महाराज प्राथमिक विद्यालयाच्या मैदानात पावसाने चिखल झाला असल्याने तेथे पेव्हिंग ब्लॉक, वाळू, माती टाकण्यात आली होती. 


मतदारांसाठी तातडीची वैद्यकीय मदत म्हणून मतदार संघात वैद्यकीय पथके नेमण्यात आली होती. त्यामध्ये, एकूण ९० कर्मचारी नेमण्यात आल्याची माहिती भोसरी रूग्णालयाच्या प्रमुख डॉ.शैलजा भावसार यांनी सांगितले. या पथकात आशा वर्कर्स, आरोग्य सेविका, परिचारिका, मदतनीस यांचा समावेश होता. या पथकांना प्रथमोपचार कीट बरोबरच सुमारे ९० व्हिलचेअर्स पुरविण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT