पुणे

बिटकॉइनच्या सूत्रधार बंधूंना दिल्लीत अटक 

सकाळवृत्तसेवा

पुणे - बिटकॉइनच्या माध्यमातून झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार अमित महेंदरकुमार भारद्वाज (वय 35) याच्यासह त्याचा भाऊ विवेककुमार (31, रा. नवी दिल्ली) या दोघांना आज पहाटे आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिल्लीत अटक केली. त्यांना 13 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. 

भारद्वाज बंधूंनी स्थापन केलेल्या गेन बिटकॉइनमध्ये नोटाबंदीच्या काळात काळा पैसा गुंतवण्यासाठी सर्वाधिक गुंतवणूक झाल्याचे समोर आले आहे. मुख्य सूत्रधाराच्या कुटुंबीयांसह सात जणांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याची माहिती पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

मुख्य सूत्रधार अमित भारद्वाज पोलिसांच्या हाती लागत नव्हता. तो दिल्लीत येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार शहर पोलिसांचे पथक दहा दिवसांपासून दिल्लीत होते. दरम्यान, बिटकॉइनबाबतची ही देशातील सर्वांत मोठी कारवाई आहे. गर्भश्रीमंतांपासून इंटरनेटचा वापर करणारे, उद्योजक, व्यावसायिक, गृहिणी, डॉक्‍टर, काळा पैसा बाळगणाऱ्यांना जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले जात होते. याबरोबरच कंपनीमध्ये एक गुंतवणूकदार आणल्यास त्या सदस्याला शंभर ते एक हजार डॉलरचे बक्षीस देण्याचे आमिष दाखवून आकर्षित केले जात होते. 

कंपन्यांवर कंपन्या ! 
अमित व विवेक भारद्वाज यांनी 2015 मध्ये गेन बिटकॉइन नावाची कंपनी आणि तिचे संकेतस्थळ सुरू केले. त्यांचे वडील महेंदरसिंग यांना कंपनीचे प्रमुख केले. पैसे मिळविण्यासाठी श्रीमंतांवर लक्ष केंद्रित केले. त्यांना एका बिटकॉइनच्या बदल्यात अठरा महिन्यांत 1.8 बिटकाइन देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी दोन नव्या कंपन्यांची त्यांनी स्थापना केली. गुंतवणूकदारांना परतावा देण्याची वेळ आली तेव्हा, एकही रुपया दिला गेला नाही. प्रत्यक्षात गुंतवणूकदारांना मोबदला म्हणून अवघ्या 13 रुपये मूल्याचे एमकॅप त्यांना दिले अन्‌ त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. 

सेव्हन स्टार मालामाल ! 
महेंदरकुमार भारद्वाज, अमित भारद्वाज, विवेक भारद्वाज, अजित भारद्वाज, आशिष दबास, मनू शर्मा व रूपेश सिंग हे सात जण (सेव्हन स्टार) अमित भारद्वाज याने स्थापन केलेल्या कंपन्यांचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत. सातपैकी चार जण भारद्वाज कुटुंबीयांमधीलच आहेत. या सात लोकांनाच सर्वाधिक आर्थिक फायदा झाला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 

पोलिसांवर दबाव 
पोलिस आयुक्त शुक्‍ला म्हणाल्या, ""भारद्वाज याच्या कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांमधील सात जणांची "सेव्हन स्टार' नावे जाहीर करू नयेत, यासाठी आपल्यावर दबाव येत होता. मात्र, आपण दबावाला कदापि बळी पडणार नाही.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT