पुणे

Loksabha 2019 :  कोथरूड विधानसभा मतदारसंघ नेत्यांना मताधिक्‍क्‍यांचा विश्‍वास ? 

ज्ञानेश सावंत

पुणे - कोथरूड विधानसभा मतदारसंघ हा भाजप आणि शिवसेनेचा गड आहे. येथे सरकारांविरोधातील जनमताचा फायदा उठवून शिरकाव करण्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रयत्न असतानाच यंदा मात्र, मतदानाचा टक्का कमी झाला. 

तो ५.६४ टक्‍क्‍यांनी घसरला. परिणामी, हे चित्र विरोधकांच्या पथ्यावर पडेल आणि कोथरूडमध्येच धक्का बसून महायुतीच्या उमेदवाराचे मताधिक्‍य कमी होईल, अशी अटकळ विरोधकांची आहे. परंतु, आपली ताकद असलेल्या प्रभागांत वाढलेल्या मतदानाचा दाखला देत, सत्ताधारी भाजप नेते मताधिक्‍क्‍याचा विक्रम करण्याचा विश्‍वास देत आहेत. प्रभागांतील मतदानाचे आकडे पाहता भाजपच्या विक्रमाची उत्सुकता आहे. परिणामी, या निवडणुकीत कोथरुरूमध्ये कोण बाजी मारेल ? याचा फैसला महिनाभराने होईल.  

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कोथरूडमध्ये इच्छुकांनी विधानसभा निवडणुकीचा अंदाज घेतला. पहिली प्रचारफेरी पूर्ण केली. जागावाटपात हा मतदारसंघ भाजप की शिवसेनेच्या ताब्यात येईल ? या निकालासाठी बराच अवधी आहे. परंतु, लोकसभेला महायुतीचे उमेदवाराला पालकमंत्री गिरीश बापट यांना भरघोस मते देण्याची स्पर्धा भाजप-शिवसेना नेत्यांत पाहायला मिळाली. कोथरूडकरांमध्ये सत्ताधाऱ्यांबाबत नाराचीचा सूर आहे, असे मानून दोन्ही काँग्रेसचे कार्यकर्ते झटत होते. याचा परिणाम, लोकसभेच्या मागील निवडणुकीत भाजपचे उमेदवार अनिल शिराेळे यांना मिळालेल्या ९१ हजारांच्या मताधिक्‍यात घट होईल आणि हा आकडा ६० ते ६५ हजारांपर्यंत खाली जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. प्रत्यक्षात बापट यांच्या मतांची आघाडी शिरोळेपेक्षा २५ हजारांनी अधिक असेल, असा हिशेब भाजप नेत्यांचा आहे. कोथरूडमध्ये किमान पाय रोवता येतील, या आशेने काम करणाऱ्या दोन्ही काँग्रेसला पारंपरिक मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढता आलेले नाही. असे आकड्यावरून स्पष्ट आहे. दोन्ही काँग्रेसचे तीन नगरसेवक निवडून आलेल्या सुतारदरा, केळेवाडी, हनुमानगरमध्ये ४५ टक्के मतदान झाले. त्याचवेळी पहिल्यांदाच भाजपच्या पाठिशी असलेल्या बाणेर-बालेवाडीत ४४ टक्केच मतदान झाले. भाजपला मानणाऱ्या प्रभागांत म्हणजे, मयूर कॉलनी, आयडीएल कॉलनी, प्रभात रस्ता, कर्वेनगरात अनुक्रमे ५६, ५७ आणि ५२ टक्के मतदान झाले. या भागातील मतदारांचा कौल भाजपच्या पाठिशी राहिला आहे. त्यामुळे बापट यांना लाखापेक्षा अधिक मताधिक्‍य मिळेल, हा आमदार मेधा कुलकर्णींचा शब्द खरा ठरणार की, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या यंत्रणेचा तब्बल सव्वालाखाच्या मताधिक्‍याचा विश्‍वास खरा ठरणार, याचे औत्सुक्‍य आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT