BJP
BJP 
पुणे

पुण्यात भाजपच्या 'या' दोघांमध्ये सर्वाधिक मताधिक्याची लढाई

सकाळ वृत्तसेवा

पुणे : विधानसभा निवडणुकीत पुण्यात चंद्रकांत पाटील (चंपा) की माधुरी मिसाळ (मामि) सर्वाधिक मताधिक्य मिळवणार, याबद्दल शहरातील कार्यकर्त्यांमध्ये पैजा लागल्या आहेत. मात्र, मताधिक्य कोणालाही मिळो, याचा दूरगामी परिणाम शहरातील राजकारणावर होणार अशीच चिन्हे आहेत. 

पाटील यांच्यासाठी भाजपची पुण्यात कोथरूडमध्ये प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यासाठीच भाजपने गिरीश बापट, रवी अनासपुरे, राजेश पांडे आदींची कुमक लावली आहे. पाटील यांचा विजय केवळ भाजपला पुरेसा ठरणार नाही, तर मताधिक्य हा मुद्दा कळीचा ठरणार आहे. त्यासाठीच कोथरूडमधील 24 पैकी 18 नगरसेवक भाजपने दम देऊन कामाला लावले होते. लोकसभा निवडणुकीत भाजपला 1 लाख 4 हजार मतांचे मताधिक्य येथे होते. त्यामुळे स्वाभाविकपणे तेवढेच मताधिक्य पाटील यांना हवे आहे. 

मिसाळ यांची आमदारकीची तिसरी टर्म आहे. 2014 ला त्यांनी काँग्रेसचे अभय छाजेड, राष्ट्रवादीचे सुभाष जगताप या दिग्गजांचे डिपॉझिट जप्त करण्यात यश मिळविले होते. यंदाही त्यांचे प्रयत्न तसेच सुरू होते. त्या साठीच त्यांनी पर्वती मतदार संघातील 27 पैकी 23 नगरसेवक सक्रिय करण्याचा चंग बांधला होता. मिसाळ यांना गेल्यावेळी या मतदारसंघातून सुमारे 70 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकीत त्यांनी प्रयत्नपूर्वक नगरसेवक वाढविले. त्यांत यश आल्यामुळे यंदा त्यांना स्वाभाविकपणे 1 लाखांपेक्षा जास्त मताधिक्याची अपेक्षा आहे. 

मिसाळ यांचा गेल्यावेळी मंत्रिमंडळात प्रवेश त्यांना राज्यमंत्रीपद नको असल्यामुळे हुकला होता. त्यामुळे यंदा त्यांना कॅबिनेट आणि पालकमंत्री पदाची अपेक्षा आहे. मात्र, पाटील यांच्या पुण्यातील प्रवेशामुळे अनेक समिकरणे बदलेली आहेत. त्यामुळे पुण्यात सर्वाधिक मताधिक्य मिळवून आपला दावा प्रबळ करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे तर सर्वाधिक मताधिक्याच्या प्रतिष्ठेसाठी पाटील झगडत आहेत. त्यामुळे सर्वाधिक मताधिक्याची लढाई पुण्यात चुरशीची झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT