BJP-sena imposes waste in Hadapsar says Chetan tupe
BJP-sena imposes waste in Hadapsar says Chetan tupe 
पुणे

Vidhan Sabha 2019 : भाजप-सेनेने हडपसरवर कचरा प्रकल्प लादला- चेतन तुपे

सकाळ वृत्तसेवा

हडपसर (पुणे) : भाजप-सेना सरकारच्या काळात हडपसरमध्ये नवीन कचरा प्रकल्प लादले. यामुळे दुर्दैवाने हडपसरची ओळख मागील काही वर्षात कचरानगरी अशी झाली. या भागाची ओळख बदलण्याचा मी निर्धार केला असून आमदार झाल्यानंतर येथील कचरा प्रकल्प हटविण्याबाबत मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन हडपसर विधानसभा मतदारसंघ महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांनी केले.

रामटेकडी, वैदूवाडी, गोसावीवस्ती परिसरात त्यांनी जनतेशी संवाद साधला, याप्रसंगी ते बोलत होते. तुपे म्हणाले, राष्ट्रवादीच्या हाती महानगरपालिका होती, तेव्हा आम्ही लोकांची कामे केली आहेत. आघाडीची सत्ता आली तर आम्ही भौतिक सुविधा नक्कीच देणार. शरद पवार साहेबांनी नेहमीच लोक हिताच्या कामांना महत्व देऊन जनतेचे प्रश्न सोडविले आहेत. आम्ही त्यांचाच विचार पुढे घेऊन जात आहोत.

म्हस्के म्हणाले, भीमनगर, घोरपडी, बी. टी. कवडे रोड, भागात महाआघाडीच्या नगरसेवकांनी नागरिकांची मूलभूत प्रश्न सोडवले. त्यामुळे येथील जनता महाआघाडी उमेदवाराला निच्छीतपणे पाठिंबा देतील.

याप्रसंगी नगरसेवक आनंद अलकुंटे, दशरथ शिंदे, विलास अलकुंटे, माजी नगरसेवक प्रशांत म्हस्के, सुरेखा कवडे, विजया कापरे, पार्वती भडके, रंजना पवार, चंद्रकांत कवडे, आबा कापरे, हनु तुपे, संजय डोंगरे, राजू कोंडे, मख्खनसिंग कल्याणी, संजय तुपे, निजाम शेख, मारूती धुमाळ, प्रविण तुपे, अॅड. असल्म सय्यद, निजाम शेख, राजू शिवले, सुधीर शिंदे, विक्रम राऊत, सागर कांबळे, माजी नगरसेवक प्रशांत म्हस्के, चंद्रकांत कवडे, आबा कापरे, पार्वती भडके, संकेत कवडे, सागरराजे भोसले, सविता मोरे यांच्यासह परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Labour Day : एक दंगल झाली आणि त्यामुळे जगात कामगार दिन साजरा होऊ लागला, वाचा इतिहास

Maharashtra Din 2024 : बहु असोत सुंदर संपन्न की महा..प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा.! महाराष्ट्र दिनाच्या द्या हटके शुभेच्छा

ढिंग टांग : भटकती आत्मा आणि बाबा बंगाली..!

Labour Day : गरजूंना हमखास रोजगार मिळवून देणारी ही सरकारी योजना तुम्हाला माहीत आहे का ?

SCROLL FOR NEXT