bjp vinod tawde over dcm devendra fadnavis politics Sakal
पुणे

Vinod Tawade : फडणवीस सुडाचे राजकारण करत नाहीत - विनोद तावडे

आमची आणि शिवसेनेची विचाराच्या आधारावर युती झालेली होती. नरेंद्र मोदी यांच्या नावावर त्यांना मत मिळाली, उमेदवार निवडून आले होते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आमची आणि शिवसेनेची विचाराच्या आधारावर युती झालेली होती. नरेंद्र मोदी यांच्या नावावर त्यांना मत मिळाली, उमेदवार निवडून आले होते. पण उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली. त्यामुळेच आम्हाला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जावे लागले.

राज्यातील महत्त्वाचे निर्णय केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा करून घेतले जातात, देवेंद्र फडणवीस सुडाचे राजकारण करत नाहीत, असे सांगत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी फडणवीस यांची बाजू सावरून घेतली. पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित वार्तालापामध्ये पत्रकारांशी तावडे यांनी संवाद साधला. पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सरचिटणीस सुक्रुत मोकाशी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत वैयक्तीक वाद नसल्याचे एका मुलाखतीमध्ये सांगितले, त्यावर तावडे म्हणाले, मोदी व्यक्तीगत राजकारण करत नाही. भाजपकडून बेरजेचे राजकारण करत आहे.

पहिल्या दोन टप्प्यात गेल्या वेळी जेवढे मतदान झाले तेवढेच मतदान झाले आहे. देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असे वातावरण आहे. विरोधी पक्षाच्या २० ते ३० टक्के बूथवर बसण्यासाठी कार्यकर्ते नाहीत अशी स्थिती हे.

काँग्रेसने ८० वेळा घटनेत बदल केला आहे, पण भाजपने ४०० पारचा नारा दिल्यानंतर घटनेत बदल केला जाईल असे सांगत आहेत. निवडणुकीत मत मिळणार नाहीत या भीतीने काँग्रेसच्या कोणत्याही जाहिरातीमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी यांचा फोटा वापरलेला नाही.

२०१९ च्या निवडणुकीत राहुल गांधी यांचा अमेठीतून पराभव झाला, यावेळी वायनाड मधून पराभव होण्याची शक्यता असल्याने त्यांनी आता रायबरेलीतून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रियांका गांधी या निवडणूक लढविणार हे जवळपास निश्चित झाले होते, अशी टीका तावडे यांनी केली.

भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांवर चार्जशीट दाखल आहे. न्यायालयाच्या निर्णयावर पुढचं ठरवू. तर खडसेंच्या पक्षप्रवेशावर ते म्हणाले, एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश लवकरच होईल. त्याच्या प्रवेशाला देवेंद्र फडणवीस यांचा विरोध नाही.

राज्यात शरद पवार साहेब आपल्या सुनेचा बाहेरची सून आणि संजय राऊत अमरावतीच्या उमेदवारावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. प्रचार हा मुद्द्यावर झाला पाहिजे, पण प्रचार खालच्या स्तरावर गेला आहे. दिल्लीत जाऊन बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. मी महाराष्ट्राच्या राजकारणात येणार नाही, दिल्लीच राहणार आहे असे तावडे यांनी सांगितले.

तावडे म्हणाले...

- महिला मतदारांचा भाजपला पाठिंबा

- राज्यातील ४८ पैकी ४०जागा महायुतीला मिळतील

- आम्ही केवळ मतासाठी जाहीरनामा काढत नाही.

-आमच्याकडे २०४७ पर्यंतचे व्हीजन आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : कर्जाच्या पैशातून मोदींचा केक कापणार? वाढदिवस साजरा करणे म्हणजे आर्थिक गुन्हा, संजय राऊतांचे राज्य सरकारवर ताशेरे

Latest Marathi News Updates : कांद्याचे दर घसरले, शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

जरा आवरा अन् Google Gemini ला स्वत:चे पर्सनल फोटो देण्यापूर्वी ही बातमी वाचा... नाहीतर वेळ निघून जाईल, तज्ज्ञांचा इशारा

कलाकार हवा तर असा ! दशावतारचं यश पाहून हिंदी मीडियाने केलं दिलीप प्रभावळकरांचं कौतुक "बॉलीवूडला लाज वाटायला.."

Rahuri Accident: 'दुचाकींच्या अपघातात एक ठार, एक जखमी'; दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर भीषण धडक

SCROLL FOR NEXT