पुणे

उत्सव रेसिडन्सीत  पाच दिवसांपासून अंधार 

नीलेश कांकरिया


पुणे ः वाघोलीतील आव्हाळवाडी रस्त्यावरील उत्सव रेसिडन्सीमधील 174 सदनिकाधारक पाच दिवसांपासून अंधारात आहेत. जेसीबीच्या खोदकामात महावितरणची केबल तुटल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. यामुळे पाणी, लिफ्ट यासाठी जनरेटरवर मोठा खर्च होत आहे. या प्रकाराने रहिवासी हैराण झाले आहेत. 


या सोसायातील वीजपुरवठा करणारी केबल भूमिगत आहे. त्या परिसरात खोदकाम सुरू असताना पाच दिवसांपूर्वी ही केबल तुटली. सोसायटीधारकांनी महावितरणला ऑनलाइन व महावितरण कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली. कर्मचाऱ्याने ती केबल जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे पुन्हा समस्या निर्माण झाली. यानंतर महावितरणने तेथील समस्या शोधली, मात्र ती दूर करण्यासाठी "तुम्ही जेसीबी द्या, तुम्हीच त्याचा खर्च करा,' असे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सांगितल्याचे सोसायटीधारकांनी सांगितले. यापूर्वी चार ते पाच वेळा हा प्रकार घडला आहे. त्या वेळीही सोसायटीधारकांना चार ते पाच दिवस अंधारात राहावे लागले होते, तसेच पैसे खर्च करावे लागले होते. दुरुस्तीचा खर्च मोठा होत असल्याने सोसायटीधारक तो देऊ शकत नाहीत. शनिवारी सोसायटी पदाधिकाऱ्यांनी महावितरण कार्यकारी अभियंत्याची भेट घेऊन तक्रार केली. 
वाघोलीत अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीची परवानगी न घेता बेकायदा खोदकाम केले जाते. त्यामुळे केबल्स, जलवाहिन्या तुटतात. त्याचा भुर्दंड नागरिकांना बसतो. मात्र ग्रामपंचायत अशा बेकायदा कामावर कारवाई करत नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. 
रविवारी चार वाजण्याच्या दरम्यान तुटलेली केबल जोडण्याच्या कामास सुरवात करण्यात आल्याचे सोसायटीधारकांनी सांगितले. 

ऑनलाइन तक्रार अन्‌ निराकरण 
उत्सव रेसिडन्सीमधील सोसायटीधारकांनी विद्युत प्रवाह खंडित झाल्याची ऑनलाइन तक्रार केली होती, परंतु वीजप्रवाह सुरळीत न होताही तक्रारींचे निराकरण केल्याचे महावितरणच्या संकेतस्थळावर दिसत आहे. 

 

पाच दिवसांत डिझेलसाठी चाळीस हजार 

जनरेटरवर पाणी, लिफ्ट व सोसायटीतील सार्वजनिक वीज चालते. पाच दिवसांत जनरेटरसाठी सुमारे सहाशे लिटर डिझेल लागले. त्यासाठी 40 हजार रुपये खर्च झाला असल्याचे सभासदांनी सांगितले. 
--------------------------------------------------------------------""पाच दिवसांपासून आम्ही अंधारात आहोत. यामुळे खूपच समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गरजेची वीज उपकरणे चालू ठेवावी लागत असल्याने डिझेलवर मोठा खर्च होत आहे. पाणी, कचरा ती तर समस्या वेगळीच आहे. वाघोलीत राहायचे कसे तेच कळत नाही.'' -गोकुळ वधे, सोसाटीधारक 
--------------------------------------------------------------------
""कालच तक्रार प्राप्त झाली आहे. पावसामुळे काम करण्यास विलंब होत आहे. पाऊस थांबला की त्वरित काम करू. सोसायटीने पैसे द्यायची गरज नाही.'' - गणेश श्रीखंडे, अभियंता, महावितरण वाघोली कार्यालय 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT