manjari
manjari 
पुणे

मांजरीमध्ये विविध मागण्यांसाठी दृष्टीहीनांची पदयात्रा

कृष्णकांत कोबल

मांजरी - आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय दृष्टीहीन संघ पुणे विभागीय शाखा व हडपसर साथी फाउंडेशनच्या वतीने जागतिक पांढरी काठी दिनाचे औचित्य साधून हडपसर ते महादेवनगर अशा पदयात्रेचे आयोजन केले होते. सुमारे तीनशे दृष्टीहीन त्यामध्ये सहभागी झाले होते.

शाळेमध्ये दृष्टीहीन विद्यर्थ्यांना मारहाण केली जाते, दृष्टीहीन कर्मचाऱ्यांच्या विरोधात जाणीवपूर्वक चुकीच्या तक्रारी नोंदविल्या जातात. बंदी नंतर व्यवहारात आलेल्या नवीन नोटा हताळण्याच्या प्रशिक्षणाचा अभाव आदी विविध प्रश्नांना सध्या दृष्टीहिनांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत अपंग कल्याण आयुक्तालयात वारंवार पाठपुरावा करुनही न्याय मिळवून दिला जात नाही. अपंग कल्याण उपायुक्तांकडून आमच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत आहे, अशी तक्रारही पदयात्रेतील सहभागींनी केली आहे. उपायुक्तांना आमच्यासाठी वेळ नसेल तर सरकारने त्यांची बदली करून आमचे प्रश्न समजून घेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्याची नेमणूक येथे करावी, अशी मागणी राष्ट्रीय दृष्टीहीन संघ पुणे विभागाचे अध्यक्ष शिवानंद नंदी यांनी यावेळी केली.

डॉ.जयंत चिपळूणकर, शाखेचे अध्यक्ष शिवानंद नंदी, महासचिव दशरथ शिंदे, डॉ. धनाजी कोंडे, रिना पाटील, हडपसर साथी फाउंडेशनचे आनंद पवार, विशाल सुर्वे, सुधीर शेळके,सचिन जगताप, विरेंद्र अंबेटी ,सारिका शेवाळे, दशरथ पवार आदी यावेळी उपस्थित होते.

साथी फाउंडेशनच्या वतीने यावेळी प्रत्येक दृष्टीहीनांना पांढरी काठी मोफत दिली. तसेच त्यांना अन्नदानही करण्यात आले. दिवाळी निमित्त सर्वांना ब्रेल लिपीतील शुभेच्छा कार्ड भेट देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT