Aditi-Bamb
Aditi-Bamb 
पुणे

शरीरसौष्ठवामुळे जीवनशैलीत बदल - आदिती बंब

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - ‘‘शरीरसौष्ठव क्षेत्र केवळ पुरुषांची मक्तेदारी राहिलेली नाही. महिलाही पुढे येऊ लागल्या आहेत. स्वतःच्या शारीरिक तंदुरुस्तीबद्दल महिलांमध्ये जागृती वाढली आहे. शरीरसौष्ठव खेळामुळे महिलांची जीवनशैली बदलू शकते,’’ असे मत शहरातील पहिली आशियाई ब्राँझपदक विजेती फिटनेस मॉडेल आदिती बंब हिने व्यक्त केले.

थायलंड येथे ११ ते १७ डिसेंबरला होणाऱ्या दहाव्या ‘वर्ल्ड बॉडी बिल्डिंग अँड फिजिक स्पोर्टस चॅंपियनशिप’साठी आदितीची भारतीय संघात निवड झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ती ‘सकाळ’शी बोलत होती. 

मूळची मध्य प्रदेशातील उज्जैन येथील रहिवासी असलेल्या आदितीने इलेक्‍ट्रॉनिक इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. सध्या जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून कसून सराव करत आहे.

आदिती म्हणाली, ‘‘हिंजवडीतील टेक महिंद्रामध्ये दोन वर्षे नोकरी केली. परंतु, त्यामध्ये मन रमले नाही. माझे वडील ललित बंब हेदेखील पूर्वाश्रमीचे शरीरसौष्ठवपटू आहेत. त्यांना आशियाई स्पर्धेत मला पदक मिळेल याची अपेक्षा नव्हती. परंतु, पदक मिळाल्यावर त्यांना खूप आनंद झाला. शरीरसौष्ठव क्षेत्रात मॉडेल फिजिक, ॲथलेटिक फिजिक, फिटनेस फिजिक आणि वूमन बॉडी बिल्डिंग असे प्रकार आहेत. त्यामध्ये महिला पुढे येऊ शकतात.’’ 

शरीरसौष्ठव क्षेत्रातील स्टेरॉईड्‌सच्या वाढत्या वापराबद्दल आदिती म्हणाली, ‘‘स्टेरॉईड्‌सचा वापर करण्याऐवजी माझा निव्वळ नैसर्गिक पोषक आहारावरच भर आहे. स्टेरॉईड्‌सचे दुष्परिणाम लक्षात घेता त्याचा वापर टाळणेच योग्य आहे.’’

सुवर्ण व ब्रॉन्झपदक
आदितीने वर्षी फेब्रुवारीत ‘पुणे श्री’मध्ये सुवर्ण, तर ‘महाराष्ट्र 
श्री’ स्पर्धेत मॉडेल फिजिक प्रकारात ब्रॉन्झपदक मिळविले आहे. पुण्यातील ‘मिस इंडिया’ स्पर्धेतही पहिल्या १५ महिला खेळाडूंत स्थान पटकाविले होते. रायपूर येथे मार्च २०१८ मध्ये आशियायी आणि जागतिक स्पर्धेसाठी झालेल्या निवड चाचणीत तिची भारतीय संघात निवड झाली होती.

वडिलांना अश्रू अनावर   
मध्यप्रदेश शरीरसौष्ठव संघटनेतर्फे, आदिती आणि तिचे वडील ललित यांचा एकत्रित सत्कार झाला. त्यावेळेस, वडिलांच्या डोळ्यामधून आनंदाश्रू वाहू लागले. आदितीच्या पदक विजेत्या कामगिरीबद्दल त्यांनी तिचे कौतुक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT