book
book 
पुणे

विद्यार्थ्यांना मार्गदर्शक पुस्तकांचे वाटप

रामदास वाडेकर

टाकवे बुद्रुक : टाटा पॉवरने ठोकळवाडी धरण परिसरातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५००ते २१००रूपये किंमतीची मार्गदर्शक पुस्तकांचे वाटप केले. या परिसरात १०००विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. टाटा पाॅवरने आपला सामाजिक विकास निधी या परिसरातील विकास कामे व मदतीसाठी द्यावा या आशयाची बातमी सकाळने या आठवड्यात प्रसिद्ध केली होती, तिची दखल घेत दोन दिवसा पासून टाटाने विद्यार्थ्यांना पुस्तके वाटयला सुरूवात केली आहे. 

या परिसरातील वाहनगाव, कुसवली, नागाथली, शिंदेवाडी, वडेश्वर, माळेगाव, किवळे, इंगळूण सह सर्व गावातील पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे. वाहनगावच्या भैरवनाथ माध्यमिक व जिल्हा परिषदेच्या शाळेत टाटा पाॅवरचे आधिकारी अतूल करवटकर, शशांक नारकर, मनोहर म्हेत्रे, प्रधान, गुरव यांच्यासह ठोकळवाडी धरणपरिसरातील राजेश खांडभोर, नारायण ठाकर, निवृत्ती वाडेकर, शांताराम लष्करी, गुलाब गभाले, बळीराम वाडेकर आदी उपस्थितीत होते.

या वृत्ताची दखल दखल घेत टाटा पाॅवरने पंधरा ते वीस लाख रूपये खर्च शैक्षणिक साहित्यावर खर्च करून त्याचे वाटप केल्याचे मान्यवरांनी या वाटप प्रसंगी सांगितले. 
राजेश खांडभोर म्हणाले,"टाटा या पूर्वी कमी अधिक मदत करीत होते,सकाळने या विषयाला प्रसिद्धी दिल्यानंतर प्रथमच इतक्या मोठया रक्कमेची मदत होत आहे.ही आनंदाची गोष्ट असली तरी टाटा पाॅवर सह इनरकाॅन ,रिलायन्स व एचपीसीएल या वायूवाहिनी कंपनीने देखील आपला सहभाग नोंदवावा, या परिसरात सर्व सोयी युक्त मोठया रुग्णालयाची गरज आहे. 

नारायण ठाकर म्हणाले,"या परिसरातील खाजगी शिकवणीची सोय नसल्याने, मार्गदर्शक पुस्तकांचा विद्यार्थ्यांना फायदा होईल. पण बारावी कला शाखेच्या शिवाय येथे शिक्षणाची सोय नाही. सर्व शाखांसह कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाची गरज आहे.परिसरात पाच माध्यमिक शाळा आहे पण दोनच कनिष्ठ महाविद्यालय आहे.
माजी सरपंच निवृत्ती वाडेकर म्हणाले,"लोकसहभाग आणि सामाजिक विकास निधीतून आर्थिक मदत मिळाली तर कनिष्ठ व वरिष्ठ  महाविद्यालया करिता गावात जागेची सोय उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेऊ.

शांताराम लष्करी  व संदीप लष्करी म्हणाले,"परिसरातील सर्व धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची लवकरच बैठक घेऊन विकासासाठी पाठपुरावा करण्यात येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "केजरीवालांना स्वतंत्र कोठडी अन् साधा कूलरही नाही"; आतिषी यांचा राज्यपालांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

SCROLL FOR NEXT