boom-barrier
boom-barrier 
पुणे

बीआरटी स्थानकांवर ‘बूम बॅरिअर’

सकाळ वृत्तसेवा

पुणे - बीआरटी मार्गावर होणारी खासगी वाहनांची घुसखोरी रोखण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून पावले उचलण्यात आली आहेत. शहरातील सर्व बीआरटी स्थानकांवर ॲटोमॅटिक तंत्रज्ञान असलेले ‘बूम बॅरिअर’ बसविण्याचा निर्णय प्रशासनाने घेण्यात आहे. सुरवातीला प्रायोगिक तत्त्वावर संगमवाडी-विश्रांतवाडी मार्गावर याची चाचणी घेतली जाणार आहे.

सार्वजनिक वाहतूक जलद करण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पाच मार्गांवर ‘बीआरटी’ अर्थात बस रॅपिड ट्रान्झिट सुरू करण्यात आले. पीएमपी बसच्या माध्यमातून याठिकाणी सेवा दिली जाते. मात्र, या मार्गावर खासगी वाहनांची होणारी घुसखोरी होऊन अनेकदा अपघात घडतात. ही घुसखोरी रोखण्यासाठी पीएमपी प्रशासनाने बीआरटी स्थानकांवर वॉर्डनची नेमणूक केली आहे. परंतु, तरीही वाहनांची घुसखोरी नियंत्रणात येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने बीआरटी स्थानकांवर बूम बॅरिअर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. टोल नाक्‍यावर अशाप्रकारचे ॲटोमॅटिक बॅरिअर बसविण्यात येतात. याच धर्तीवर बीआरटी स्थानकांवरदेखील हे बॅरिअर बसविण्यात येणार आहेत.

पीएमपी कार्यालयात बुधवारी बीआरटी देखभाल समितीची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठाणकर, वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, महापालिका कर्मचारी उपस्थित होते. बूम बॅरिअरच्या संदर्भातील प्रस्ताव महापालिकेकडे पाठविण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT