Accident News
Accident News esakal
पुणे

Accident : लोणी देवकर येथे दोन वेगवेगळ्या अपघातात दोघींचा मृत्यू

संतोष आटोळे

इंदापूर - इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन दिवस झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन महिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

याबाबत शिल्पा संदीप धापटे (वय 27 वर्षे, रा. रुई मराडेवाडी, ता. इंदापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रविवार (ता. 21) रोजी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान फिर्यादी या त्यांचे ताब्यातील स्कूटी गाडी (नंबर MH42 AY 2232) हीचे वरून आपल्या आजी छबाबाई सोमनाथ गावडे (वय 70 वर्षे, रा. पारवडी, ता. बारामती, जि. पुणे) यांचेसह इंदापूर वरून मराडवाडी कडे जात असताना मौजे लोणी देवकर (ता. इंदापूर) गावचे हद्दीत हॉटेल रोकडेचे समोर रोडवर अचानक एका पिवळ्या रंगाचे जेसीपी वाहनावरील अज्ञात चालकाने रोडचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून समोर न पाहता भरधाव वेगात येऊन अचानक फिर्यादीचे गाडीला डावी बाजूंनी जोराचे धडक देऊन अपघात करून फिर्यादीचे हाताला पायाला डोक्याला दुखापत झाली.तर फिर्यादीचे आजीचे दोन्ही पायाला हाताला गंभीर व किरकोळ जखमा होऊन आजीचा मृत्यू झाला.यावरून अज्ञात जेसीबी चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसऱ्या घटनेत कांतीलाल गेना तरंगे (वय 37 वर्षे, रा. तरंगवाडी, ता. इंदापुर) यांनी दिलेल्या फिर्यादनुसार सोमवार (ता. 22) रोजी दुपारी 12 च्या दरम्यान चुलत भाऊ शंकर मोहन तरंगे हा त्याची आई विमल मोहन तरंगे (वय 55 वर्षे, रा. तरंगवाडी, ता. इदापुर, जि. पुणे) यांना घेऊन त्यांच्याकडील दुचाकी (क्र. एम एच 42 बी ए 4255) वरुन पुणे सोलापुर हायवे वर पुणे बाजुकडे जात असताना मौजे लोणीदेवकर गावच्या हद्दीत ब्रीजवरुन जात असताना पाठीमागुन येणारे सेलोरो गाडी (क्र.एम एच 14 जे यु 4705) यावरील चालक नाव पत्ता माहीत नाही याने त्याचे ताब्यातील वाहन हयगयीने चालवून मोटारसायकलला पाठीमागुन ठोस दिल्याने झालेल्या अपघातामध्ये शंकर तरंगे याचे दुखापत तसेच फिर्यादीची चुलती विमल मोहन तरंगे यांचा मृत्यू झाला.यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दोन्ही घटनांचा पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक राउत हे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Income: रिझर्व्ह बँकेने केली 2 लाख कोटींहून अधिक कमाई; RBI पैसे कसे कमावते?

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Ebrahim Raisi: मौलवी कुटुंबात जन्म ते इराणचे अध्यक्ष, जाणून घ्या इब्राहिम रईसी यांची समलैंगिकतेपासून महिलांपर्यंतची मते

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

SCROLL FOR NEXT