पुणे

चाकूने भोसकून प्रेयसीचा चंदननगरला खून 

सकाळ वृत्तसेवा

पुणे - दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून प्रियकराने चंदननगर येथे चाकूने भोसकून प्रेयसीचा खून केला. मीना पटेल (वय २३, रा. चंदननगर, मूळ रा. गोंदिया) असे तिचे नाव आहे. किरण अशोक शिंदे (वय २५, रा. काळेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. प्रकाश बापू गप्पाट यांनी चंदननगर ठाण्यात फिर्याद दिली. 

किरण शिंदे हा पिंपरीतील महाविद्यालयात इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. तो हिंजवडीतील एका कंपनीतही काम करतो. मीना पटेल ही सुरवातीला काळेवाडीत राहात होती. त्यामुळे तिची आणि किरणची ओळख झाली. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दरम्यान, मीना ही चंदननगर येथील बीपीओमध्ये बॅंक ऑफिसमध्ये नोकरी करत होती. सहा महिन्यांपासून तिने किरणशी बोलणे कमी केले. तिचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय किरणला आला. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला होता. दरम्यान, ती चंदननगर भागात राहायला आली. त्यांचे भेटणे बंद झाले असले तरी दोघेही व्हाट्‌सॲपच्या माध्यमातून संपर्कात होते. 

मंगळवारी रात्री किरणने मीनाला चंदननगर येथील टाटा गार्डरूमजवळ भेटण्यासाठी बोलावले. तेथे त्याने तिला जाब विचारल्याने दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला. त्या वेळी किरणने रागाच्या भरात तिच्यावर चाकूने सपासप वार केले. तेथून किरणने पळ काढल्यानंतर तिला नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. पण, तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेनंतर किरण हा पळून गेला असून, त्याचा पोलिस शोध घेत आहेत.

वाहतूक पोलिसांकडे घेतली धाव 
चाकूने वार झाल्यानंतर १०० मीटरवरील चौकात वाहतूक पोलिस उभे असल्याचे मीनाला दिसले. तिने जीव वाचविण्यासाठी त्यांच्याकडे धाव घेतली, त्या वेळी किरणही तिचा पाठलाग करत होता. पोलिसाला पाहताच त्याने पाठलाग करणे सोडून दिले व तेथून पळ काढला. पोलिसांनी त्याच्या मित्रांकडे, घरात चौकशी केली; पण दोन दिवसांपासून तो घरी आलाच नव्हता, तसेच कामावरही गेला नव्हता. त्यामुळे त्याला सर्वजण शोधत होते, असे वरिष्ठ निरीक्षक कृष्णा इंदलकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : आज कपिल पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार

SCROLL FOR NEXT