PMRDA
PMRDA 
पुणे

राजकीय दबावामुळे कारवायांना ‘ब्रेक’

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला तब्बल दीड वर्षापासून राजकीय हस्तक्षेपांमुळे अडथळे येत आहेत. अनधिकृत बांधकाम कारवाईच्या काळात राजकीय पदाधिकाऱ्यांचे फोन खणखणतात. परिणामी, कारवाई न करताच पथकाला माघारी फिरण्याची वेळ येते.
पीएमआरडीएच्या हद्दीत झालेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे नियोजन करण्यात येत. मात्र त्या करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

मावळमधील इंदोरीत २७ नोव्हेंबर २०१९ रोजी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे नियोजित करण्यात आले. मात्र हस्तक्षेपामुळे कारवाई न करताच पथक मागे फिरावे लागले. नऱ्हे-आंबेगाव येथे झालेल्या कारवाईतही राजकीय पदाधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप केल्याने नाइलाजास्तव ही कारवाई थांबवावी लागली. पुन्हा सात जानेवारी २०२० रोजी इंदोरीत तोच प्रकार घडला. पुरंदरमधील भिवरी, शिरूरमधील कुंजीरवाडीतही अनधिकृत बांधकाम कारवाया थांबवाव्या लागल्या 
आहेत. 

स्थानिक नागरिकांचाही जोरदार विरोध होत असल्याने अनेकदा कारवाई थांबवावी लागतात. परिणामी, बांधकाम कारवाईचा टक्का घसरत आहे. कारवाई करण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात तयारी करावी लागते. ‘पीएमआरडीए’ला मोठा फौजफाटा तैणात ठेवावा लागतो. स्थानिक पोलिस ठाण्याला आठ दिवस अगोदरच पत्र देऊन कारवाईची कल्पना द्यावी लागते. स्थानिक तसेच पीएमआरडीएचा असे दोन्ही पोलिस बंदोबस्त, तहसीलदार व अधिकारी मिळून कारवाईचे नियोजन केले जाते. यंत्रसामग्रीमध्ये पोकलेन, बुलडोझरची यंत्रणा उभी करावी लागते. मात्र हस्तक्षेपामुळे कारवाई थांबवावी लागली तर या सर्व यंत्रणेवर पाणी फिरते.

पीएमआरडीएने नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये कारवाई न करता बांधकाम सर्वेक्षण केले आहे. यात औद्योगिक पट्ट्यांचा समावेश आहे. त्यात १८० बांधकामांचे सर्वेक्षण केले. यातील २३ बांधकामांना बांधकाम नियमितीकरणासाठी प्रस्ताव दाखल करण्याचे सुचविण्यात आले. विविध सूचना या बांधकामधारकांना देण्यात आल्या आहेत. पीएमआरडीएमध्ये झालेल्या या बैठकीस १२५ बांधकामधारक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT