pune
pune 
पुणे

बीआरटीचे बगीचे गेले वाळून; महापालिकेचे दुर्लक्ष

सकाळवृत्तसेवा

कात्रज : सातारा रस्ता बीआरटीचा पुनर्विकास रखडलेला असताना कात्रज परिसरात अंतिम टप्प्यातील सुशोभीकरण कामातील फ्लॉवर बेड आणि बगीचे वाळून गेले आहेत. उन्हाचा तडाखा वाढत असताना पाण्याअभावी शोभीवंत झुडुपांचे वाळवंट झाले आहे. केवळ दुर्लक्षामुळे हिरवळीवर केलेला खर्च वाया गेला आहे. 

स्वारगेट ते कात्रज बीआरटी मार्गाच्या पुनर्विकासाचे गुऱ्हाळ संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. बीआरटी मार्गातील रुंदीकरणात शिल्लक राहिलेल्या जागांचा होणारा दुरुपयोग टाळणे, ताब्यात आलेल्या जागा उपयोगात आणून मार्गाचा पर्यावरणपूरक विकासाचा हेतू मागे पडला आहे. जवळच्या अंतरात नागरिकांनी प्रशस्त पदपथांचा वापर करावा.

लांबच्या अंतरात सायकलचा वापर करावा. प्रदूषण टाळण्यासाठी वैयक्तिक वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देणारा अर्बन स्ट्रीट डिझाइन हा जागतिक प्रयोग रखडला आणि अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. 
कात्रज ते पूर्वेला प्राणी संग्रहालय आणि पश्‍चिमेला कात्रज डेअरीपर्यंत पुनर्विकसाचे तीन किलोमीटरचे काम दुतर्फा पूर्ण झाले आहे. मोबदला देण्यावरून दुमत असल्यामुळे खासगी जागेतील पन्नास मीटर लांबीचे काम आजतागायत रखडले आहे. पूर्ण झालेल्या दुतर्फा तीन किलोमीटरच्या कामात प्रशस्त पदपथांची उभारणी झाली आहे. दर पंधरा फुटांवर मोठी झाडे डौलू लागली आहेत. मार्गाचे अधिकचे सुशोभीकरण व्हावे, यासाठी जागोजीगी बगीचे आणि फ्लॉवर बेडची रचना करण्यात आली आहे. त्यात माती टाकून शोभीवंत हिरवळ फुलवण्यात आली होती. या सर्व ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. उन्हाचा चटका वाढू लागल्यानंतर ठराविक अंतराने पाणी देण्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आता ही हिरवळ संपुष्टात आली आहे. काही बेटे पूर्णपणे वाळून गेली आहेत. तेथे नव्याने हिरवळ फुलवण्यासाठी जादा खर्च 
करण्याची नामुष्की ओढवली आहे. काही बेटे तग धरून आहेत, त्यांना तरी पाणी देणे आवश्‍यक आहे. 

सातारा रस्ता पुनर्विकासाचे रखडलेले काम नागरिकांसाठी प्रचंड त्रासदायक ठरत आहे. अवाढव्य बसथांबे उभारले असताना अनुकूल बस येत नाहीत, तोपर्यंत त्याचा उपयोग शुन्य आहे. सुशोभीकरणासाठीचे बगीचे जगवण्याची जबाबदारी तरी मगापालिकेने स्वीकारली पाहिजे. 
अॅड. रवींद्र नरभवर 

पाण्याची व्यवस्था असतानाही बगीच्याला पाणी देणे होत नाही ही शोकांतिका आहे. हिरवळीमुळे मार्ग आकर्षक होतोच, त्याचवेळी पदपथावरील तापमान कमी होणास मदत होते. जे केलेय ते टिकवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. 
- दिनेश काळभोर 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

SCROLL FOR NEXT