BSNL
BSNL 
पुणे

बीएसएनएलचा वीजपुरवठा खंडित

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - बीएसएनएलचे ५० लाखांचे वीजदेयक थकल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केला. चिंचवड येथील काकडे पार्क परिसरातील सुमारे दोन हजार नागरिकांच्या दूरध्वनी आणि इंटरनेटसेवेला पंधरवड्यापासून फटका बसला आहे. त्यामुळे ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली. 

बीएसएनएलचे चिंचवड परिसरात सुमारे २५ हजार ग्राहक आहेत. बीएसएनएलने महावितरणचे वीजबिल वेळेत भरले नाही. त्यामुळे गेले १५ दिवस जनरेटरद्वारे दूरध्वनी आणि इंटरनेटसेवा सुरू आहे. मात्र, जनरेटर सुरू असेपर्यंतच ही सेवा सुरू असते. जनरेटर बंद झाल्यावर सेवा पुन्हा खंडित होते. काकडे पार्क परिसरातील ग्राहकांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे. या भागातील नागरिकांनी याबाबत बीएसएनएलकडे अनेक तक्रारी केल्या. परंतु, नेहमीच या सेवा खंडित होत असल्याने ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.  

यासंदर्भात ग्राहक अजय जगताप यांनी सांगितले, की बीएसएनएलकडून ग्राहकांना मिळणाऱ्या सेवेत नेहमीच काही ना काही कारणाने व्यत्यय येत असतो. याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांकडे विचारणा केल्यावर समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत.

आमच्याकडे वीजबिलाचे पैसे देण्यासाठी निधी उपलब्ध नव्हता. त्यामुळे काही दिवस सेवा खंडित झाली होती. मात्र, महावितरण कंपनीच्या थकीत वीजबिलापैकी काही रक्कम भरली आहे. उर्वरित रक्कम एक-दोन दिवसांत भरण्यात येईल.
- एच. महंतेश, उपसरव्यवस्थापक, बीएसएनएल, चिंचवड विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौसमोर मुंबईनं नांगी टाकली; 5 षटकात 4 फलंदाज तंबूत

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT