Crime
Crime sakal
पुणे

Pune Crime : उच्चभ्रू परिसरात घरफोड्या करणाऱ्यास तेलंगणातून अटक

सकाळ वृत्तसेवा

पुणे/येरवडा - गुगलवर शोध घेऊन शहरातील उच्चभ्रू परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला तेलंगणातून अटक करण्यात आली आहे. येरवडा आणि चतु:शृंगी पोलिसांनी ही कारवाई केली.

नरेंद्र बाबू नूनसावत (वय २७, रा. आरटीसी कॉलनी, हैदराबाद, तेलंगण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने दोन साथीदारांच्या मदतीने येरवडा आणि चतु:शृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीचे तीन गंभीर गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत.

या सराईताकडून अडीच लाख रुपये किमतीचा गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली. कल्याणीनगर येथे सहा ऑक्टोबर रोजी खिडकीचे ग्रील उचकटून चोरट्यांनी साडेसात लाखांचे दागिने आणि अडीच लाखांची रोकड चोरून नेली होती.

या गुन्ह्यातील मुख्य आरोपी नरेंद्र तेलंगणामध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून विशेष तपास पथकाने आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. आरोपीने सतीश बाबू करी आणि गुरुनायक केतावत (रा. हैदराबाद, तेलंगण) यांच्या मदतीने घरफोड्या केल्याची कबुली दिली.

अतिरिक्त पोलिस आयुक्त (पूर्व) रंजनकुमार शर्मा, पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलिस निरीक्षक (गुन्हे) कांचन जाधव, जयदीप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

गुगलच्या मदतीने घरफोड्या

चोरटे इंटरनेटवर ‘रिच एरिया’ सर्च करून उच्चभ्रू परिसराची माहिती घेत होते. त्यानंतर बंद घरांची रेकी करून घरफोडीचे गुन्हे करण्याची त्यांची कार्यपद्धती होती. येरवड्यातील कल्याणीनगर आणि चतु:शृंगी परिसरातील भोसलेनगर भागात तीन घरफोडीच्या गुन्ह्यात आरोपींनी सुमारे ६० लाख रुपयांचे दागिने आणि रोकड चोरी केली होती.

पोलिसांनी येरवडा परिसरातील घरफोडीतील अडीच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपींविरुद्ध यापूर्वी तेलंगण, हैदराबाद, तिरुपती आणि चेन्नई परिसरात २० ते २५ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: संसदेची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आजपासून CISF कडं!

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT