जात प्रमाणपत्र पडताळणी sakal media
पुणे

Pune : पावसामुळे जात पडताळणी कार्यालयातील प्रस्ताव खराब

प्रस्तावासह उपस्थित राहण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पावसाचे पाणी शिरल्यामुळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयातील अभिलेख, संगणकासह साहित्य खराब झाले आहे. त्यामुळे पडताळणीचे प्रस्ताव सादर केलेल्या अर्जदारांनी प्रस्ताव सादर केल्याची पोच आणि त्यासोबत सादर केलेल्या कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

येरवडा परिसरात ९ ऑक्टोबरला सायंकाळी अचानक झालेल्या पावसामुळे समितीच्या कार्यालयातील मागील बाजूची कारागृहाची संरक्षण भिंत कोसळली. त्यामुळे पावसाचे पाणी जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात शिरले. पावसाचे पाणी रात्रभर कार्यालयात साचून राहिल्यामुळे कार्यालयातील जात प्रमाणपत्र पडताळणीचे दस्तावेज, संगणक आणि इतर साहित्य भिजून खराब झाले आहे.

जात पडताळणी समितीच्या कार्यालयातील भिजलेली कागदपत्रे सुकवून, यादी तयार करावयाचे कामकाज सुरु आहे. जात प्रमाणपत्र पडताळणीचे चौकशीसाठी समिती कार्यालयात येणाऱ्या अर्जदारांनी प्रस्ताव दिलेली पोच पावती आणि त्यासोबत सादर केलेल्या कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह उपस्थित राहावे. एखादा प्रस्ताव कार्यालयात उपलब्ध नसल्यास तो पुन्हा तयार करून समितीमार्फत त्यावर योग्य कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयामार्फत देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satyapal Malik Networth: सत्यपाल मलिक यांच्याकडे किती मालमत्ता होती? डोक्यावर होतं कर्ज

Pune Road Potholces : पुण्यात खड्ड्यांचा ‘जिवंत देखावा’; रस्ते दुरूस्तीकडे महापालिकेचे दुर्लक्ष

'ती त्याच्यासमोर पुर्णपणे विवस्त्र होती' राखी सावंतचा तनुश्री दत्तला टोमणा, म्हणाली...'हिला फक्त नाना पाटेकर...'

Latest Maharashtra News Updates Live : नवी मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराविरुद्ध स्थानिकांचे आणि माजी नगरसेवकांचे साखळी उपोषण

Silent Signs Of Kidney Damage: सकाळी उठल्यानंतर शरीर देत असलेल्या 'या' 5 इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका! असू शकतात किडनी खराब असण्याची लक्षणे

SCROLL FOR NEXT