
थोडक्यात:
किडनी शरीरातील पीएच, मीठ, पाणी आणि विषारी घटकांचे संतुलन राखते व रक्त शुद्ध करते.
बदलती जीवनशैली, चुकीचा आहार आणि अनुवंशिकता यामुळे किडनीचे कार्य बिघडू शकते.
मधुमेह व उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींमध्ये किडनी आजारांचा धोका अधिक असतो, त्यामुळे लक्षणे वेळेत ओळखणे महत्त्वाचे आहे.
Do Not Ignore These Unsusal Signs Of Kidney Damage Occuring In The Morning: शरीरातील अनेक महत्त्वाच्या अवयवांपैकी किडनी हा एक अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. जो शरीरातील पीएच पातळी, मीठाचे प्रमाण, पोटॅशिअम आणि इतर आवश्यक घटकांचे संतुलन राखण्याचे तसेच विषारी पदार्थ फिल्टर करण्याचे महत्त्वाचे काम करतो.
मात्र, बदलती जीवनशैली, असंतुलित आहार आणि अनुवंशिक कारणांमुळे किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. किडनी कमजोर झाल्यास रक्त शुद्ध होण्याची प्रक्रिया बाधित होते, ज्यामुळे विषारी घटक शरीरात साचण्याचा धोका वाढतो.
मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या लोकांमध्ये किडनीच्या आजारांचा धोका जास्त असतो. अनेक लक्षणे सूक्ष्म आणि अनपेक्षित असतात, त्यामुळे ती वेळेत ओळखणे आवश्यक आहे. चला तर मग, किडनीच्या नुकसानाची ही लक्षणे कोणती ते जाणून घेऊया.
आपल्या हाताच्या मुठीच्या आकाराच्या असलेलय किडनी शरीरासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. रक्तदाब नियंत्रित करणारे हार्मोन्स तयार करणे, लाल रक्तपेशींचे उत्पादन संतुलित ठेवणे व कॅल्शियम शोषणासाठी आवश्यक असलेलय व्हिटॅमिन Dला सक्रिय करणे हे काम करतात.
परंतु, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर जुनाट आजरांमुळे किडनी कमकुवत होऊ शकतात, ज्यामुळे हाडे कमकुवत होणे, मज्जासंस्थेचे नुकसान आणि कुपोषण यासारख्या समस्या उद्भवू शकतात. प्रकृती अधिक बिघडल्यास डायलिसिस किंवा प्रत्यारोपणाची गरज भासू शकते. त्यामुळे किडनीच्या आरोग्याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे.
तुम्हाला सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर हलकीशी सूज दिसत असेल तर ती दुर्लक्षित करू नका. विशेषतः जर तुमचे पाय किंवा टाचा देखील सुजलेल्या वाटत असतील, किडनीच्या आजाराचे हे एक लक्षण असू शकते. तज्ज्ञ सांगतात, जेव्हा किडनी रक्तातील विषारी घटक व्यवस्थित गाळत नाही, तेव्हा शरीरात अतिरिक्त द्रव साचते आणि त्यामुले सूज येते.
सकाळी उठल्यावर केलेल्या पहिल्या लघवीत तुम्हाला जर फेस आणि लहान बुडबुडे दिसत असतील तर ते किडनीच्या समस्येची चिन्हे असू शकतात. तज्ज्ञांच्या मते, ही स्थिती लघवीत जास्त प्रमाणात प्रोटीन असल्याचे दर्शवते, ज्याला ‘प्रोटिन्यूरिया’ (Proteinuria) म्हणतात. याचा अर्थ किडनी योग्यरित्या रक्त गाळू शकत नाही आणि त्यांचे कार्य बाधित होत आहे.
किडनीच्या कार्यात बिघड झाल्यास शरीरात विषारी घटक आणि घाण साचते, त्यामुले घामग्रंथी (Sweat Glands) आकुंचित (Shrink) पावतात. परिणामी त्वचा कोरडी पडू लागते आणि खाज वाढते. आपले शरीर अशी रसायने बनवते ज्यामुळे अॅलर्जी आणि खाज सुटण्याची लक्षणे उद्भवतात, जी कितीही मॉइश्चरायझर लावूनही दूर होत नाहीत. अशा वेळी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते.
जेव्हा किडनीचे कार्य मंदावते, तेव्हा शरीरात विषारी घटक रक्तात साचू लागतात, ज्यामुळे थकवा येणे, लक्ष केंद्रित न होणे आणि मेंदू दुसरं वाटणे (Brain Fog) यासारख्या समस्या निर्माण होतात. यामुळे अॅनिमिया जपून थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. त्यामुले त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही फायद्याचे ठरते.
सकाळी उठल्यावर तोंडातून घाण वास येणे हे सहसा किडनीच्या आजाराचे लक्षण नसते , पण जर ते सतत होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यकी आहे. किडनी जेव्हा रक्त योग्यरीत्या रक्त फिल्टर करू शकत नाही तेव्हा त्यातील विषारी घटक श्वासाद्वारे बाहेर पडतात, ज्यामुळे दुर्गंधी निर्माण होते. याला 'युरेमिक ब्रीद' (Uremic Breath) असे म्हणतात.
वरील दिलेली कोणतीही लक्षणे जर तुम्हाला प्रकर्षाने जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. दुर्लक्ष केल्यास अधिक गंभीर समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे त्वरित वैदयकिय तपासणी करून घ्या आणि निरोगी आयुष्य जगा!
किडनी कमजोर झाल्याची लक्षणे कोणती असू शकतात?
(What are the signs of weak or damaged kidneys?)
किडनी खराब झाल्यास चेहऱ्यावर व पायांवर सूज, फेसाळ लघवी, कोरडी त्वचा आणि खाज, सकाळचा दुर्गंधी श्वास, तसेच ब्रेन फॉगसारखी लक्षणे दिसू शकतात.
किडनीशी संबंधित लक्षणे दिसल्यास काय करावे?
(What should I do if I notice symptoms related to kidney problems?)
अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. लवकर निदान केल्यास उपचार सोपे होतात.
किडनीचे कार्य शरीरात कसे महत्त्वाचे आहे?
(Why is kidney function important in the body?)
किडनी रक्त शुद्ध करते, शरीरातील विषारी घटक फिल्टर करते, पीएच आणि इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखते, तसेच हार्मोन्सचे उत्पादन आणि हाडांच्या आरोग्याची निगा राखते.
कोणत्या लोकांना किडनीच्या आजारांचा धोका जास्त असतो?
(Who is at a higher risk of kidney diseases?)
मधुमेह, उच्च रक्तदाब आणि अनुवंशिक कारण असलेले लोक किडनीच्या आजारांच्या उच्च जोखमीच्या गटात येतात.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.